भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी अंतिम सामना रोमांचकरीत्या खेळला जात आहे. लंडनच्या के ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात चेंडू आणि बॅटमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे, पण या महत्त्वाच्या सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये प्रेमी युगलांनी सर्वांचे लक्ष घेतले. स्टेडिअममध्ये बसलेल्या एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला साामन्यादरम्यान अचानक प्रपोज केले. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानेही मोठी प्रतिक्रिया दिली.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात प्रेम केले व्यक्त
खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Fianl) सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये एक मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या हातात अंगठी घालून आपले प्रेम व्यक्त केले. या प्रपोजचे उत्तर देताना मुलीने होकार कळवला. तसेच, दोघांनीही एकमेकांना किस करत गळाभेट घेतली.
रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान प्रपोज करण्याच्या कल्पनेवर रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, “लोक टीव्हीवर येण्यासाठी काहीही करतात.”
मात्र, क्रिकेटच्या मैदानावर एखाद्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक लोकांनी स्टेडिअममध्ये बसून आपले प्रेम व्यक्त केले आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हादेखील या यादीत सामील आहे. त्याने आयपीएलदरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते.
Proposal during WTC final
credits: Star Sports pic.twitter.com/VMNoW6opWj— rajendra tikyani (@Rspt1503) June 10, 2023
ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 444 धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलिया संघाने भारतापुढे डब्ल्यूटीसी अंतिम सामना जिंकण्यासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला होता. चौथ्या दिवशी या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 3 विकेट्स गमावत 164 धावा केल्या आहेत. खेळपट्टीवर विराट कोहली (नाबाद 44) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद 20) टिकून आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरीत्या केला आहे. सन 1976मध्ये भारताने 403 धावा करून विजय साकारला होता. (A Boy Propose His Girlfriend in stadium in wtc final 2023 ricky ponting also commented read here)
महत्वाच्या बातम्या-
‘शुबमनच्या जागी स्मिथ असता, तर पंचांनी…’, थर्ड अंपायरच्या निर्णयावर रवी शास्त्रींचे रोखठोक भाष्य
ऑस्ट्रेलियाच्या ‘सिंहा’पुढे रोहितची होते चिडीचूप, आतापर्यंत कसोटीत ‘इतक्यांदा’ दाखवला तंबूचा रस्ता