---Advertisement---

SA20 | डेविड मिलरचा अफलातून झेल, अगदी शेवटच्या क्षणी साधली संधी

David Miller
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाचा तुफानी फलंदाज डेविड मिलर सध्या दक्षिण आफ्रिका 20 म्हणजेच एसए20 लीगमध्ये खेळथ आहे. राजस्तान रॉयल्स संघाच्या मालिकचा पार्ल रॉयल्स संघाकडून मिलर खेळत आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने विजेतेपद पटकावले. गुजरात संघाचा हा पहिला आयपीएल हंगाम असून संघाला विजय मिळवून देण्यात डेविड मिलरची भूमिका महत्वाची राहिली होती. एसए20 लीगमध्ये मिलरची बॅट सध्या शांत दिसत आहे, मात्र त्याने रविवारी (22 जानेवारी) त्याने एक जबरदस्त झेल घेतला आणि चर्चेत आला.

एसए20 लीगमध्ये रविवारी पार्ल रॉयल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात आमना सामना झाला. डेविड मिलर (David Miller) याने  या सामन्यात एक जबरदस्त झेल पकडला. मिलर सध्या 33 वर्षांचा असून हा झेल पकडल्यानंतर त्याची क्रिकेट कारकिर्द अजून मोठी आहे, ही गोष्ट स्पष्ट झाली. कॅपिटल्स संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत होता. डावाच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विल जॅक्स याच्या रूपात कॅपिटल्स संघाने पहिला झटका मिळाला. त्यानंतर संघाचा डाव कुसल मेंडिसने सांभाळला, पण मिलरने त्याला जास्त वेळ खेळपट्टीवर टीकू दिले नाही.

एका हातात पकडला अफलातूण झेल –
डावाच्या आठव्या षटकात रबरेज शम्सी गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मेंडिस स्ट्राईकवर होता आणि त्याने हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जास्त बाऊंस झाल्यामुळे बॅटवर व्यवस्थित आला नाही. परिणामी चेंडू बॅटला लागून हवेत उडाला आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला गेला. मिलर त्यावेळी शॉर्ट मिडविकेटवर उभा होता आणि चेंडू हवेत असल्याचे पाहून जोरात धावला. चेंडू जमीनीवर पडणार तितक्यात मिलरने अगदी ‘सुपरमॅन’ प्रमाणे डाईव्ह मारत तो पकडला. मिलरने हा झेल पकडल्यानंतर मेंडिस देखील हैराण होता. मेंडिसची चांगलीच निराशा झाली आणि त्याला खेळपट्टी सोडावी लागली. मेंडिसने 26 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. प्रिटोरिया कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 158 धावा केल्या.

एसए20 लीगचा हा पहिला हंगाम असून लीगमध्ये आयपीएल फ्रँचायझींनी मोठी गुंतवणूक केली आहे. रविवारी लीगचा 18 सामना प्रिटोरिया कॅपिटल्स आणि पार्ल रॉयल्स यांच्यात खेळला गेला. (A brilliant catch by David Miller in sa20)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपच्या ‘नो-बॉल’ समस्येवर ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सुचविला उपाय, म्हणाला, “त्याने 100 टक्के”
इंदोर वनडे टीम इंडियासाठीच बनलाय ‘डू ऑर डाय’! तब्बल 4 वर्षांनी आलाय हा मौका

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---