---Advertisement---

शंभर सामने उलटले, पण शैली तीच!! बुमराहची पहिली अन् शंभरावी विकेट, बघा खास व्हिडिओ

---Advertisement---

कोणत्याही गोलंदाजासाठी क्रिकेट कारकिर्दीतील पहिली आणि शंभरावी विकेट खूप खास असते. त्यातही कमीत कमी डावांमध्ये विकेट्सची शंभरी गाठणे, म्हणजे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. नुकतेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने हा किर्तीमान केला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात द ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याने हा पल्ला गाठला आहे. हा विक्रम साध्य केल्यानंतर एका चाहत्याने बुमराहच्या पहिल्या आणि शंभराव्या विकेटचा व्हिडिओ कोलाज करुन टाकला आहे.

या व्हिडिओत दिसते की, बुमराहने त्याची पहिली कसोटी विकेट आणि शंभरावी कसोटी विकेट अगदी सारख्याच पद्धतीने घेतली आहे. त्यामुळे १०० कसोटी सामने उलटले तरीही बुमराहची शैली मात्र तीच राहिली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

२७ वर्षीय बुमराहने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या पदार्पणाच्या सामन्यात विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स हा त्याचा पहिला बळी ठरला होता. ६५ धावांवर खेळत असलेल्या डिविलियर्सला त्याने जादुई चेंडू टाकत त्रिफळाचीत केले होते.

अगदी याचप्रमाणे ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या डावात त्याने इंग्लंडचा खेळाडू ऑली पोपला बाद केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला पोप २ धावांवर खेळत होता. अशावेळी बुमराहने अप्रतिम चेंडू टाकत पोपला काही कळायच्या आत त्याच्या बत्त्या गुल केल्या.

https://twitter.com/jattuu12/status/1434874444703420416?s=20

पोपची विकेट घेत बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० विकेट्स तर पूर्ण केल्याच. पण सोबतच त्याने महान वेगवान गोलंदाज कपिल देव यांनाही मागे सोडले. तो सर्वात कमी सामने खेळून १०० गडी बाद करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने २४व्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी कपिल देव आहेत. कपिल देव यांनी २५ कसोटी सामन्यात १०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तर इरफान पठाणने २८ आणि मोहम्मद शमीने २९ सामन्यात १०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

लाईव्ह सामन्यात कोहलीला सुचली मस्ती, इंग्लंडच्या खेळाडूला धावा बनवण्यासाठी दाखवला गॅप- VIDEO

‘बुमराह संघात असल्यास अश्विनची कोणाला गरज भासेल’, इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचे लक्षवेधी विधान

पराभवानंतर रूटचा ऊहापोह; म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी रिव्हर्स स्विंगने आमचा घात केला’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---