युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हरभजन सिंगने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. चर्चांना उधाण आल्यावर त्यानं तो डिलीट करुन टाकला. माफीही मागितली. पण याचा काही उपयोग झाल्याचं दिसत नाही. कारण हा व्हिडिओ संपूर्ण अपंग लोकांची खिल्ली उडवणारा असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे एका एनजीओने या तीन माजी क्रिकेटपटूंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्याविरुद्धच्या तक्रारीची सुरुवात एका व्हिडिओने सुरु झाली. माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये भज्जीसोबत युवराज सिंग आणि सुरेश रैनाही होते. व्हिडिओमध्ये तिन्ही क्रिकेटपटू बॉलीवूड स्टार विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ या गाण्यावर विचित्र डान्स करताना दिसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते वेदना दाखवत होते.
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने या पोस्टमध्ये लिहिले की, “दिग्गज क्रिकेटच्या 15 दिवसांच्या आत माझे शरीर अडचणीत आले होते. शरीराचा प्रत्येक अवयव दुखत होता” हा व्हिडिओ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या फायनलनंतरचा आहे, ज्यामध्ये भारतानं पाकिस्तान पराभव केला होता.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिने तीव्र आक्षेप व्यक्त केला. तिनं इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “तुमच्यासारख्या क्रिकेट स्टार्सकडून जबाबदारी अपेक्षित आहे. कृपया अपंग लोकांची चेष्टा करू नका. हा विनोद नाही.”
हा गोंधळ पाहून हरभजन सिंगनं व्हिडिओ डिलीट केला. त्यानं माफीही मागितली. हरभजन सिंगने लिहिले की, “चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आम्ही इंग्लंडमध्ये सोशल मीडियावर ‘तौबा तौबा’ गाण्याचा व्हिडिओ बनवला, ज्याबद्दल काही लोक तक्रार करत आहेत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाचा आदर करतो. 15 दिवस सतत खेळून दुखत असलेल्या आपल्या शरीराची वाईट अवस्था दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला होता.” यादरम्यान, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्याविरोधात दिल्लीतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-विराटनंतर संघात त्यांची जागा कोण घेणार? भारताच्या माजी प्रशिक्षकानं दिली प्रतिक्रिया
ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘किंग’ कोहलीनं दिल्या शुभेच्छा…!
रिंकू सिंहबाबत बॅटिंग कोचची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, “त्याला कसोटीत संधी मिळाली तर…”