---Advertisement---

‘ही कामगिरी त्याच्यासाठी’, पंजाबविरुद्ध ४ विकेट्स घेणाऱ्या चाहरचे टीका करणाऱ्या त्या चाहत्याला सडेतोड उत्तर

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 6:15 PM
Faf Du Plessis, Deepak Chahar and DJ Bravo
---Advertisement---

शुक्रवारी (१७ एप्रिल ) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने-सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाचे दीपक चाहरने आपल्या गोलंदाजीने कंबरडे मोडले होते. या सामन्यानंतर, शार्दुल ठाकूरला दिलेल्या मुलाखतीत त्याने एक मोठा खुलासा केल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात दीपक चाहरने ४ षटक गोलंदाजी केली होती. यात त्याने अवघ्या १३ धावा देत ४ गडी बाद केले होते. परंतु पहिल्या सामन्यात दिपक चाहरला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ पराभूत झाला होता. या सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी करत ३६ धावा खर्च केल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याला सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या होते. एका चाहत्याने त्याला चक्क पुढील सामना खेळू नकोस असे देखील म्हटले होते. पण पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर चाहरने त्याला चांगल्या कामगिरीतून प्रतिउत्तर दिले आहे.

दुसऱ्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवल्यानंतर दीपक चाहरने शार्दुल ठाकूरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मी खूप चांगली किंवा खूप वाईट अशी गोलंदाजी केली नव्हती. या सामन्यात मी ३६ धावा खर्च केल्या होत्या. सामना झाल्यानंतर जेव्हा मी हॉटेलमध्ये गेलो होतो, तेव्हा सोशल मीडियावर मला एका मुलाचा मेसेज आला होता. तो म्हणाला होता की, भाऊ तू खूप चांगला गोलंदाज आहेस. परंतु एक विनंती आहे की, पुढचा सामना खेळू नकोस.”

तसेच चाहर पुढे म्हणाला की,”पंजाब संघाविरुद्ध केलेली ही कामगिरी त्या सोशल मीडियावाल्या मुलासाठी आहे. त्याने पाहायला हवं की मी जर हा सामना खेळलो नसतो तर असे प्रदर्शन करता आले नसते. जर एक खेळाडू एका सामन्यात चांगली कामगिरी करत नसेल तर तुम्ही त्याला वाईट घोषित करून टाकतात. थोडं सहकार्य करत जा.”

पंजाब किंग्ज संघाला अवघे १०६ धावा करण्यात यश

पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर अवघ्या १०६ धावा करण्यात यश आले होते. पंजाब किंग्ज संघाकडून शाहरुख खानने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर रिचर्डसनने १५ धावांचे योगदान दिले. तसेच संघाचा कर्णधार केएल राहुल ५ धावा करत माघारी परतला होता. तर ख्रिस गेलने अवघ्या १० धावा केल्या होत्या. तसेच मयंक अगरवाल या सामन्यात देखील फ्लॉप ठरला आहे तो ० धावांवर माघारी परतला. यासोबतच निकोलस पूरन देखील ० धावा करत माघारी परतला होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून मिळवला विजय

पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या १०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फाफ डू फ्लेसिस ३६ धावांची खेळी केली तर मोईन अलीने ताबडतोड (४६) धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईने १६ व्या षटकात १०७ धावांचे आव्हान ४ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२१: मुंबई-हैदराबाद सामन्यात रोहित, वॉर्नर, पोलार्डसह ‘हे’ खेळाडू घालू शकतात मोठ्या विक्रमांना गवसणी

SRHच्या विजयाची नौका आज तरी होणार का पार? ‘अशी’ असेल वॉर्नर-रोहितची पलटण

ओळखलंत का? रियान परागचे ‘हे’ छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिली मजेदार नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---