भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसातील पहिल्या सत्राअखेर ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या ३ बाद ६५ धावा इतकी होती. सामन्याच्या सुरुवातीच्या १५ षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाने ३ महत्त्वपुर्ण विकेट गमावल्या. त्यापुढील षटकात अजून एक विकेट गेल्याची अपील होताच पंचाने केलेल्या एका इशाऱ्याला पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हृद्याची धडधड वाढली होती. पण शेवटी त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
झाले असे की, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांना लवकरच तंबूत धाडले. जो बर्न्स वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या षटकात शून्य धावेवर बाद झाला, तर फिरकीपटू आर अश्विनने ३० धावांवर मॅथ्यू वेडची विकेट काढली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने फलंदाजीसाठी मैदानावर उतरले.
मात्र स्मिथ १४.३ षटकात खाते न उघडताच झेलबाद झाला. त्यानंतर लॅब्यूशाने तरी आपली विकेट न गमावता बचावात्मक फलंदाजी करेल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलिया संघाला होती. अशात लगेचच १६व्या षटकाचा दुसरा चेंडू लॅब्यूशानेच्या पॅडवर लागला असल्यासारखे वाटले म्हणून गोलंदाजी करत असलेल्या बुमराहने लॅब्यूशाने पायचीत झाला असल्याची अपील केली.
त्यानंतर सामना पंच पॉल रिफिल यांनी त्यांचा निर्णय सांगण्यासाठी हात उचलण्याचा विचार केला, पण तेवढ्यात लगेचच पॉल यांनी त्यांचा हात पुन्हा खिशात घातला. त्यामुळे एका क्षणी चौथी गमावली की काय? म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हृद्याचे ठोके वाढले. अर्थातच लॅब्यूशाने नाबाद होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला.
A few hearts were in mouths after a tiny bit of a troll from umpire Paul Reiffel! 😎 #AUSvIND pic.twitter.com/TRmkZoHcUI
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2020
पुढे भारतीय संघाने रिव्ह्यूदेखील घेतला. परंतु चेंडू बॅटला स्पर्श न करता स्टंपच्या वरच्या बाजूने बाउंस झाला होता. त्यामुळे शेवटी लॅब्यूशाने नाबाद असल्याचे करार करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
गोल गिरकी घेत पुजाराने पकडला स्मिथचा अप्रतिम झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल
‘बॉक्सिंग डे’ कसोटी: भल्याभल्या दिग्गजांना न जमलेल्या विक्रमाची रॉस टेलरच्या नावे नोंद, ठरला पहिलाच