भारतीय संघ आगामी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) जीवनावर बायोपिक बनवण्यात येणार आहे. भारताच्या दिग्गज महान खेळाडूंपैकी एक असलेल्या युवराजनं कॅन्सरशी लढाई जिंकली. युवराजची आजाराशी झुंज देण्यापासून ते विश्वचषक ट्रॉफी उचलण्यापर्यंतची कहाणी खरोखरच प्रेरणादायी असणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी-सीरीजचे भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि 200 नॉट आउट चित्रपटाचे रवी भागचंदका (Ravi Bhagchandka) एकत्र युवराजच्या जीवनावर एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शक (Director) आणि कलाकारांबाबत (Character) अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला की, “मला खूप अभिमान आहे की, माझी कथा भूषणजी आणि रवीजी जगभरात राहणाऱ्या माझ्या करोडो चाहत्यांना दाखवतील. क्रिकेट हे माझे सर्वात मोठे प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यातील चढ-उतारांमध्ये हीच माझी ताकद आहे. मला आशा आहे की, हा चित्रपट लोकांना त्यांच्या आव्हानांवर मात करण्यास मदत करेल आणि त्यांची स्वप्ने, आवड पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरणा देईल.”
भूषण कुमार (Bhushan Kumar) म्हणाला, “युवराज सिंगचे आयुष्य हे लढाऊ, विजय आणि उत्कटतेची कथा आहे. त्याचा प्रवास नवोदित क्रिकेटपटू ते क्रिकेटचा नायक असा झाला आहे आणि मग तो खऱ्या आयुष्यातला हिरो बनला. हे खरोखर प्रेरणादायी आहे. मोठ्या पडद्यावर सांगण्याची आणि सेलिब्रेट करण्याची गरज असलेली कथा पुढे आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”
युवराजच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी20 सामने खेळले आहेत. 40 कसोटी सामन्यात त्यानं 33.92च्या सरासरीनं 1,900 धावा केल्या आहेत, तर 11 अर्धशतकांसह 3 शतक देखील झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 169 राहिली आहे. युवराजनं 304 एकदिवसीय सामन्यात 36.55च्या सरासरीनं 8,701 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 87.67 राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 150 आहे.
58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं 136.38च्या स्ट्राईक रेटनं 1,177 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 28.02 राहिली आहे. टी20 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 177 आहे. युवराजनं वयाच्या 13व्या वर्षी पंजाबकडून खेळायला सुरुवात केली. तो पंजाबच्या 16 वर्षाखालील संघात सामील झाला. 2007च्या टी20 विश्वचषकात युवराजनं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग 6 षटकार ठोकून इतिहास रचला होता. युवराज 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सराव न करता बांग्लादेश मालिका…’, रोहित-विराटच्या विश्रांतीवर गावस्कर संतापले
‘बाबर आझमसारखा छंद..’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने जसप्रीत बुमराहला दिला सल्ला
‘मी देशाचा सर्वोत्कृष्ट स्पिनर…’, गुजरातच्या स्टारचे बीसीसीआयला आव्हान?