Mohammad Kaif On Team India Bowlers: भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पहिला कसोटी सामना संपून जवळपास 3 दिवस झाले असले तरी अजूनही त्यावर चर्चा सुरूच आहे. कर्णधार गिलला ज्या प्रकारची पराभवाची चव चाखावी लागली, त्यामुळे दिग्गज खेळाडू नाराज असणे स्वाभाविक आहे. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफने बुमराहचा गोलंदाजी जोडीदार मोहम्मद सिराजवर निशाणा साधला आहे. 5 गडी राखून झालेल्या पराभवानंतर कैफ यांनी सिराजच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. (Mohammad Kaif on Siraj)
हेडिंग्लेच्या पिचवर फारशी मदत न मिळाल्यामुळेही बुमराहने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा आणि सिराज यांना अनुक्रमे 3 आणि 2 विकेट्स मिळाल्या, मात्र दोघांचे इकॉनॉमी रेट चिंताजनक ठरले. कृष्णाने पहिल्या डावात 6.40 च्या इकॉनॉमीने, तर सिराजने 4.50 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन आणखीनच खराब झाले. (India bowling attack issues)
त्यामुळे सिराजच्या कामगिरीबदल बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “लोक म्हणू शकतात की सिराजने पूर्ण ताकद आणि जिद्दीनं गोलंदाजी केली, पण सर, केवळ जिद्दीनं नव्हे तर डोकं, योग्य दिशा आणि लेंथ याचा वापर करून गोलंदाजी करावी लागते, जिथे विकेट्स मिळवता येतात.” (Mohammed Siraj criticism)
पुढे बोलताना कैफ म्हणाला की, दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी अत्यंत बचावात्मक खेळ केला आणि त्यामुळेच बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. “दुसऱ्या डावात बुमराहला विकेट का मिळाली नाही? कारण फलंदाजांनी फक्त डिफेन्सिव्ह खेळ केला. त्यांनी कृष्णा, शार्दूल आणि सिराजविरुद्ध आक्रमण केले. जेव्हा आपल्याला माहिती आहे की बुमराह फक्त 4-5 ओव्हर्स टाकेल, तेव्हा गेमप्लान सरळ होता, त्यांना नीट खेळा.” (Jasprit Bumrah performance)
मोहम्मद कैफ म्हणाला की, “जर दुसऱ्या टोकाला सिराजच्या जोडीला ईशांत शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये असता, तर हे दोघे मिळून गिलच्या कर्णधारपदाखाली भारतासाठी ही मालिका जिंकू शकले असते.” शेवटी कैफ म्हणाला, “या गोलंदाजीत जर तुम्ही गिलला मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि बुमराह दिले, तर मी खात्रीपूर्वक सांगतो की गिलच्या कर्णधारपदाखाली भारत ही मालिका जिंकणार. हे ते गोलंदाज आहेत जे 20 विकेट्स घेण्याची क्षमता ठेवतात.” (Shami Ishant Bumrah combination)