क्रिकेटचा सामना सुरु असताना एखादी विचित्र घटना घडणे नवीन गोष्ट नाही. असाच एक प्रकार द हंड्रेड क्रिकेट लीगमध्ये पाहण्यास मिळाला. हा प्रकार पाहून मैदानात आणि मैदानाबाहेर असेलेल्या सर्व व्यक्तींना आश्चर्य वाटले. इतकेच नाही तर बेन स्टोक्ससारखा खेळाडूही सर्व प्रकार पाहून चकीत झाला.
घडलं असं की, ट्रेंट रॉकेट्स आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स या दोन्ही संघात सामना सुरू होता. या चालू सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेला एक प्रेक्षक थेट चालू सामन्यात मैदानामध्ये आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
द हंड्रेडमध्ये बेन स्टोक्स नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाचे नेतृत्व सांभाळत आहेत. या सामन्यात ट्रेंट रॉकेट्स संघाची फलंदाजी सुरू होती. या वेळी अचानक एखादी व्यक्ती मैदानाच्या आत आली. त्याच दरम्यान स्ट्राइकवर फलंदाजी करणाऱ्या अॅलेक्स हेल्सने वेगवान एकेरी घेतली. बेन स्टोक्स क्षेत्ररक्षण, तर आदिल राशीद गोलंदाजी करत होता.
तो चाहता मैदानात आल्याने सर्वांने लक्ष विचलित झाले होते, त्यामुळे स्टोक्सने हा सर्व प्रकार पाहून पंचांना ‘डेड बॉल’ घोषित करायला सांगितले. त्यानंतर पंचांनी देखील स्टोक्सचा मुद्दा मान्य केला आणि डेड बॉलची घोषणा केली.
https://www.youtube.com/watch?v=GBgKXOpvdRY&t=32s
यानंतर असे घडलं की, आदिल रशीदने गोलंदाजी केलेल्या पुढच्याच चेंडूवर हेल्सने षटकार ठोकला. खरं तर हॅल्सने शॉट ज्या दिशेने मारला जिथे स्टोक्स सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. असे वाटले की स्टोक्स हा झेल सहज घेईल. पण नशिबाने बेन स्टोक्सला साथ दिली नाही आणि एक साधा झेल त्याच्या हातातून सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. परिणामी हा सामना स्टोक्सच्या संघाला पराभूत व्हाला लागला.
How much could Ben Stokes and Northern Superchargers come to regret this? #TheHundred pic.twitter.com/mOG0nhz2rm
— The Hundred (@thehundred) July 26, 2021
Ben Stokes has had a nightmare there. Arguing about a deadball which should have left, dropping Hales and not bowling spin at the end.
— Smigg (@theonesmigg) July 26, 2021
https://twitter.com/Shubhamk_r1/status/1419750928853307434
Another intruder: every game. Needs sorting
— Matchday Drinkers (@BFCDrinkers) July 26, 2021
— mel (@melxadamson) July 26, 2021
जर बेन स्टोक्सला हेल्सचा झेल घेण्यात यश मिळाले असते, तर सामना पलटू शकला असता. अॅलेक्स हेल्सने सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि ३४ चेंडूंत ४० धावांवर नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
दु:खद! १००० हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन, क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त
‘मास्टर ब्लास्टर’च्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
विराट अडकला वादाच्या भोवर्यात! ‘या’ कारणासाठी लवकरच मिळणार रीतसर नोटीस