---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता

On: शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020 9:51 PM
---Advertisement---

शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिला वनडे सामना ६६ धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामना रविवारी(२९ नोव्हेंबर) होणार आहे. मात्र या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला एक धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिस दुखापदग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्टॉयनिसला शुक्रवारी भारताविरुद्ध पहिल्या वनडेत गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्यामुळे तो त्याच्या ७ व्या षटकातील केवळ २ चेंडू टाकून मैदानाबाहेर गेला. त्याचे षटक ग्लेन मॅक्सवेलने पूर्ण केले. स्टॉयनिसच्या डाव्या बाजूच्या स्थायूंमध्ये ताण आला आहे. आता शुक्रवारी रात्री त्याचे स्कॅन करण्यात येणार आहे.

पहिल्या वनडेत स्टॉयनिस शून्यावर बाद 

शुक्रवारी पहिल्या वनडेत स्टॉयनिस पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तसेच गोलंदाजी करताना त्याने ६.२ षटकात २५ धावा दिल्या.

कॅमेरॉन ग्रीनला मिळू शकते संधी 

जर स्टॉयनिस रविवारी दुसऱ्या वनडे सामन्यात खेळला नाही तर कॅमेरॉन ग्रीनला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तसेच त्याच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघात सीन ऍबॉट, मोझेस हेन्रीक्स आणि ऍश्टन एगार हे अष्टपैलू खेळाडू १८ जणांच्या ऑस्ट्रेलियन संघात आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकीही एकाला संधी मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’

अटीतटीच्या झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---