fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अटीतटीच्या झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर विजय

November 27, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) पहिला टी-२० सामना ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावर खेळण्यात आला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना सामना १६-१६ षटकांचा खेळवण्यात आला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने १६ षटकात ७ बाद १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने १५.२ षटकात ५ बाद १७९ धावा करत डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ५ विकेट्सने जिंकला.

न्यूझीलंड संघाने १८१ आव्हानाचा पाठलाग करताना, कॉन्वेनी २९ चेंडूत ४१ धावां केल्या. त्यानंतर ग्लेन फिलिप्सनी ७ चेंडूत २२ धावांची आक्रमक खेळी केली. यानंतर मात्र न्यूझीलंडचा डाव गडगडला आणि ६.३ षटकात ६३ धावसंख्येवर त्यांनी ४ गडी गमावले. पण नंतर जीमी निशमने २४चेंडूचा सामना करताना ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी साकारली आणि न्यूझीलंडला सावरले.

त्याचबरोबर मिशेल सॅन्टरने १८ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंड संघाने १५.२ षटकात ५ बाद १७९ धावांवर मजल मारली. मात्र पुन्हा पावसामुळे खेळ थांबला. तोपर्यंत वेस्ट इंडिज संघाकडून ओशन थॉमसने २ व शेल्डन कॉट्रेल आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. पंरतू पुन्हा पाऊस थांबला नसल्याने ‘डकवर्थ लुईस’ या नियमानुसार न्यूझीलंड संघाला विजयी घोषित करण्यात आले.

तत्पूर्वी या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाकडून आंद्रे फ्लेचर आणि ब्रॅण्डन किंग यांनी सलामीला येत पहिल्या गड्यासाठी ३.२ षटकात ५८ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर संघाचे ५८ धावसंख्येवर ४ खेळाडू बाद झाले.

या दयनीय अवस्थेतून संघाला कर्णधार पोलार्ड आणि फॅबियन ऍलेन यांनी सावरत सहाव्या गड्यासाठी ८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पोलार्डनी ३७ चेंडूत ४ चौकार अणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याबरोबर ऍलेनने पोलार्डला साथ देताना २६ चेंडूत ३० धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने ७ बाद १८० धावसंख्या उभारली.

न्यूझीलंडकडून गोलंदाजीत प्रभारी कर्णधार टीम साऊदीने २ आणि लॉकी फर्ग्युसनने ५ गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियन खेळाडूने बांधली हार्दिकच्या बुटाची लेस, व्हिडिओ व्हायरल

सिडनीची साडेसाती संपेना! सिडनीच्या मैदानावर विराट पुन्हा अपयशी

अबब! स्टीव स्मिथचे भारताविरुद्धचे ‘हे’ आकडे तुम्हालाही करतील थक्क


Previous Post

ऑस्ट्रेलियन खेळाडूने बांधली हार्दिकच्या बुटाची लेस, व्हिडिओ व्हायरल

Next Post

…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ TheRealPCB

...तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला 'लास्ट वॉर्निंग'

Photo Courtesy: Twitter/ ICC

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

Photo Courtesy: Twitter/ ICC

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! 'हा' खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.