भारताचा माजी क्रिकेटेपटू पार्थिव पटेलने 2024च्या टी20 विश्वचषकातील सलामी जोडीबद्दल आपले मत मांडले. रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 विश्वचषक 2024मध्ये भारतासाठी सलामी फलंदाज म्हणून खेळावे, असे त्याला वाटते. यावर माजी दिग्गज खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या भारतीय संघ (Team India) मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला खेळला गेला. या सामन्यात शुभमन गिल याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत डावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल दुखापतग्रस्त आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणाने हा सामना खेळला नाहीये.
याविषयावर आकाश चोप्रा आणि पार्थिव पटेल यांच्यात चर्चा झाला. चर्चेदरम्यान आकाश चोप्रा पार्थिवच्या मताशी सहमत असल्याचे दिसले. माजी सलामीवीर फलंदाजाच्या मते पार्थिवने दिलेला सल्ला एगदी योग्य आहे. रोहित आणि विराट ने सलामी फलंदाज म्हणून सुरवात का करावी यामागील कारणही त्याने सांगीतले. आकाश चोप्रा म्हणाला, “पार्थिव पटेलने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. मलासुद्धा वाटते की रोहित आणि विराट यांनी सोबत सामन्याची सुरवात करण गैर नाही. कारण विराटने पावरप्लेमध्ये जास्तीत-जास्त चेंडू खेळावेत, अशी आपली इच्छा असते. ते दोघेही भारतीय क्रिकेटचे ‘दिल आणि धडकन’ आहेत. हे अगदी रोनाल्डो आणि मेसी सोबत खेळण्यासारख आहे. यापेक्षा चांगली बाब काय असू शकते? यामुळे मला हा पर्याय खूप आवडला.”
विराट कोहलीने याआधी सलामी फलंदाज म्हणून खूप चांगली खेळी केली आहे. मात्र त्याला जास्त वेळा सामन्याची सुरवात करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल हादेखील प्रवळ दावेदार आहे.
14 महिन्यानंतर रोहीत- विराट एकत्र टी-20 सामना खेळणार
भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित आणि विराट यांनी अनेक महिन्यांपासून एकत्र एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही. जवळपास 14 महिन्यांपुर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा रोहित आणि विराटने सोबत खेळलेला शेवटचा टी-20 सामना होता. या सामन्यातील पराभवानंतर दोघेही आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांपासून दूर राहीले. मात्र आता पुन्हा एकदा विश्वचषक 2024ला डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरु केल्याचे दिसून येते. अफगानिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट सहभागी झाला नसला तरी दुसऱ्या सामन्यापासुन तो संघाचा भाग असेल.
महत्वाच्या बातम्या
Bangladesh Cricket । नजमूल हसन यांचा मोठा निर्णय! सोडणार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद
कर्नाटक संघाला मोठा धक्का, चालू सामन्यात प्रसिध कृष्णा जखमी, उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता