रविवारी (दि. 2 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हा सामना बेंगलोरने 8 विकेट्स शिल्लक ठेवून खिशात घातला. तसेच, स्पर्धेत विजयी सुरुवात केली. या विजयात कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यासोबतच विराट कोहली याचेही मोलाचे योगदान होते. विराटच्या 82 धावांच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होतेय.
विराटने या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांवर अक्षरशः आक्रमण केले. त्याने 49 चेंडूवर नाबाद 82 धावांची खेळी केली. यामध्ये 6 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. विराटची ही खेळी पाहिल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा याने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला,
“विराटची पहिल्या सामन्यातील खेळी पाहिली तर दिसून येते की, यावेळी तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असेल. 2016 व आत्ताच्या हंगामात काही समानता आहेत. त्यावेळी देखील आयपीएलच्या सहा महिने आधी तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. यावेळी देखील तशीच परिस्थिती आहे.”
बेंगलोर संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावा केल्या. यावेळी मुंबईकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 46 चेंडूत 84 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हे आव्हान पार करताना बेंगलोरकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (Virat Kohli And Faf Du Plessis) यांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी रचत संघाचा विजय पक्का केला. डू प्लेसिस 73 धावांवर बाद झाला, तर विराटने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी साकारली. तसेच, बेंगलोरने 16.2 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावा करून पार केले.
(Aakash Chopra Confident About Virat Kohli Winning Orange Cap In 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल
Breaking । आरसीबीला मोठा झटका! वरच्या फळीतील फलंदाजाने घेतली संपूर्ण हंगामातून माघार