आशिया चषक २०२२ पूर्वी भारतीय क्रिकेट संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्याची वनडे मालिका खेळायची आहे. १८ ऑगस्ट्पासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी भारतीय संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देत या मालिकेसाठी अनुभवी शिखर धवन याच्याकडे प्रभारी कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु ऐन मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघात पुनरागमन करत असलेल्या केएल राहुलला धवनच्या जागी नेतृत्त्वपदी निवडले.
बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयावर आजी-माजी क्रिकेटपटूंच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशात माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा (Akash Chopra) या फेरबदलाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्राने (Akash Chopra On Indian Team Captaincy) बीसीसीआयच्या या निर्णयावर असहमती दर्शवली. चोप्रा म्हणाला की, “जर भारतीय संघातील खेळाडूंना निवडणे, बाहेर करणे माझ्या हातात असते, तर मी असे अजिबात केले नसते. केएल राहुल (KL Rahul) सुरुवातीला या संघाचा भाग नव्हता. आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात अगोदरच त्याचे नाव होते. मी समजू शकतो की, धवन (Shikhar Dhawan) सध्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. परंतु सत्य हेदेखील आहे की, सध्या भारतीय संघात ८-१० कर्णधार उपलब्ध आहेत.”
“रोहित शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे सर्व कर्णधार आहेत. कित्येक खेळाडूंना कर्णधार बनवले गेले आहे. मला तर वाटते की, सूर्यकुमार यादवही भारतीय संघाचा कर्णधार बनण्यापासून जास्त दूर नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत धवनला कर्णधारपदावरून हटवायला नव्हते पाहिजे,” असे पुढे चोप्राने सांगितले.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान
राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चाहर
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते
एशिया कपमध्ये रोहित ठरणार ‘हिट’मॅन! एकाहून एक बड्या विक्रमांचे रचणार मनोरे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड





