भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहालीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी (Mohali Test) सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. हा सामना जिंकत भारतीय संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या मोठ्या विजयाचा नायक ठरला गोलंदाजी अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja). जडेजाला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने जडेजाच्या फलंदाजी क्रमांकाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
जडेजा एक गोलंदाजी अष्टपैलू असल्याकारणाने त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला (Aakash Chopra On Ravindra Jadeja) येणे योग्य नाही. त्याला पाचव्या क्रमांकावर बढती देणे अयोग्य आहे, असे चोप्राचे म्हणणे आहे.
जडेजा एक गोलंदाजी अष्टपैलू
चोप्राला त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्रश्न विचारला गेला की, जडेजाला वरच्या क्रमांकावर बढती दिली जावी का, जसे इंग्लंडच्या संघाने बेन स्टोक्ससोबत केले होते?
या प्रश्नावर चोप्राने उत्तर दिले की, तुम्ही जडेजाला जितक्या वरच्या क्रमांकावर पाठवाल, तर त्याच्या गोलंदाजीचा स्तर तितकाच खालावेल. तो भारतीय संघाचा हुकुमी एक्का आहे, त्यामुळे त्याचा तसाच वापर करून घ्यायला पाहिजे. जरी आर अश्विन आणि जडेजा खूप अप्रतिम फलंदाजी करत असतील, तरीही ते कायमच एक गोलंदाजी अष्टपैलू राहतील.
स्टोक्सप्रमाणे बढती मिळण्याबद्दल चोप्रा म्हणाला की, याची (जडेजाला वरच्या क्रमांकावर बढती मिळण्याची) शक्यता खूप जास्त आहे. परंतु बेन स्टोक्स एक फलंदाजी अष्टपैलू आहे. तर जडेजा एक गोलंदाजी अष्टपैलू आहे. गतवर्षी इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यादरम्यान त्याला पाचव्या क्रमांकावर (Ravindra Jadeja On 5 Number) फलंदाजीला पाठवले गेले होते. अजिंक्य रहाणेपूर्वी त्याला फलंदाजीला पाठवले गेले होते. परंतु हा प्रयोग पूर्णपणे फसला होता. त्यावेळी परिस्थिती वेगळी असल्याने आम्ही त्यावर टीकाही केली होती.
जडेजाला त्यावेळी डावा-उजवा ताळमेळ बसवण्यासाठी त्याला या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले होते. पण तो एक चांगला खेळाडू आहे आणि तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, असेही चोप्राने पुढे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्सला मिळाला जेसन रॉयचा रिप्लेसमेंट, टी२० क्रिकेटमध्ये वेगाने धावा बनवण्यात आहे माहिर
दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडली आश्चर्यकारक घटना; वाचा सविस्तर
टीम इंडियात पुनरागमन करणार हार्दिक? एनसीएमध्ये दाखल होण्याचे मिळाले आदेश