---Advertisement---

भारतीय दिग्गजाने टी२० विश्वचषकासाठी केली संभाव्य संघाची भविष्यवाणी; ‘या’ प्रमुख खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

india-t20-team
---Advertisement---

चालू वर्षात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup) खेळली जाणार आहे. भारतीय संघाचे माजी दिग्गज सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash chopra) यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी निवडला जाणाऱ्या भारतीय संघाचा अंदाज व्यक्त केला आहे. आकाश चोप्रांनी १५ खेळाडूंची नावे सांगितली आहेत, ज्यांन भारताच्या टी२० विश्वचषकात निवडले जाऊ शकते.

आकाश चोप्रांच्या मते, टी२० विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दिग्गजांची जोडी भारताच्या डावाची सुरुवात करू शकते. जर हे दोघे सलामीवीर जोडीच्या रूपात यशस्वी ठरले, तर दुसऱ्या कोणत्या खेळाडूला यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. आकाश चोप्रा म्हणाले की, “माझी इच्छा आहे की, विराट आणि रोहितने सलामी करावी. जर असे झाले नाही, तर ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामी करतील. त्यांच्या मते तिसऱ्या क्रमांकावर या तिघांपैकीच एक फलंदाज उतरेल.”

चोप्रांच्या मते, युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांची निवड होणे अवघड आहे. पण जर या दोघांनी आयपीएल २०२२ मध्ये चांगले प्रदर्शन केले, तर त्यांना संधी नक्कीच मिळू शकते. चोप्रा म्हणाले की, “पृथ्वी शॉ सध्या ऋतुराजच्या पुढे आहे. अशात शॉला ऋतुराजच्या आधी टी२० विश्वचकात संधी मिळू शकते. त्याव्यतिरिक्त श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर यांना टी२० विश्वचषकात संधी मिळणे निश्चित आहे.”

अष्टपैलू हार्दिक पंड्याविषयी चोप्रांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. खराब फॉर्ममुळे हार्दिक सध्या संघातून बाहेर आहे आणि मागच्या मोठ्या काळापासून त्याला गोलंदाजी करता आलेली नाही. हार्दिकविषयी बोलताना चोप्रा म्हणाले की, “हार्दिक गोलंदाजी करू शकला, तर त्याला विश्वचषक स्पर्धेत संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये जर त्याने चांगले प्रदर्शन केले, तर तो संघात पुनरागमन करू शकतो. त्यांच्या मते हार्दिक एक मोठा खेळाडू आहे आणि त्याची गुणवत्ता सर्वांना माहिती आहे.”

संघातील वेगवान गोलंदाजांंविषयी बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, “जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मोहम्मद सिराज, मोहम्मद शनी, टी नटराजन आणि खलील अहमद यांच्यापैकी, बुमराह, शमी, भुवी आणि सिराज यांची निवड होण स्वाभाविक आहे. परंतु आवेश खान व कृष्णा हे गोलंदाजही संघात सामील होऊ शकतात. पण त्याना स्वतःला अजून सिद्ध करावे लागेल. हर्षल पटेल आणि शार्दुल ठाकुर यांची निवड होणे कठीण आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर हर्षल जास्त प्रभाव पाडू शकणार नाही. तसेच संघात वेंकटेश अय्यर, जडेजा आणि हार्दिक असल्यास शार्दुल ठाकुरला जागा बनवणे अवघड असेल.”

महत्वाच्या बातम्या – 

सहकाऱ्याचा साहाला समजुतीचा सल्ला; म्हणाला, “तुला आता सत्य स्विकारावे लागेल”

आयपीएलनंतर केवळ २ टी२० सामन्यांसाठी ‘या’ देशाचा दौरा करणार टीम इंडिया

रवी बिश्नोईने सांगितले पदार्पणाच्या सामन्यातील किस्से; म्हणाला..

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---