भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटविषयी मोठे विधान केले होते. शास्त्रींच्या म्हणण्याप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये १० किंवा १२ संघ नाही, तर फक्त ६ संघांना खेळण्याची परवानगी असायला हवी. शास्त्रींच्या या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा यानेही स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यानच्या काळात एकदिवसीय क्रिकेटविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) एकदिवसीय क्रिकटबाबतीत सुरू अशलेल्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळा त्यांनी कसोटी क्रिकेटविषयी ही मोठी प्रतिक्रिया दिली होती. शास्त्री म्हणाले की, “कसोटी क्रिकेट तर टिकून राहणार आहे. मात्र, जर तुम्हाला वाटत असेल की, हा फॉरमॅट अजून पुढे जावा, तर १०-१२ संघ खेळले नाही पाहिजेत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व दिले पाहिजे.”
शास्त्रींच्या या विधानानंतर आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानेही स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. चोप्रा म्हणाला की, “जर फक्त ६ संघ कसोटी क्रिकेट खेळले, तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचा त्यात समावेश असेल. पण असे होऊ शकत नाही की, फक्त ६ संघ कसोटी क्रिकेट खेळतील. कारण जो देश कसोटी क्रिकेट खेळणार नाही, त्याठिकाणी कसोटी क्रिकेटचे देशांतर्गत स्ट्रक्टरही संपुष्टात याईल आणि यामुळे कसोटी क्रिकेटचे अस्तित्व देखील धोक्यात येईल.”
दरम्यान, मागच्या काही काळापासून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटविषयी खूप चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. क्रिकेटविश्वाती अनेकांना असे वाटत आहे की, एकदिवसीय क्रिकेट शेवटाकडे चालला आहे. अनेकांनी याविषयी बोलूनही दाखवले आहे. दुसरीकडे मागच्या बऱ्याच दिवासांपासून कसोटी क्रिकेटचे महत्वा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सध्या टी-२० आणि कसोटी हे दोन फॉरमॅटची लोकप्रीयता चाहत्यांमध्ये वाढताना दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बांग्लादेशच्या दिग्गज खेळाडूने केली टी-२० क्रिकेटवर टीका! म्हणाला, ‘हा फॉरमॅट…’
भुवनेश्वर कुमार टी-२० वर्ल्डकप खेळणार की नाही? वाचा भारताच्या माजी दिग्गजाला काय वाटतं
दीपक हुड्डा ‘या’ तिघांची वाढवतोय चिंता! भविष्यात बळकवू शकतो संघातील महत्वाचे स्थान






