वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा तोंडावर आली आहे. अशात स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून त्यात रविचंद्रन अश्विन या दिग्गज फिरकीपटूला ताफ्यात सामील करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर भारताचा माजी सलामीवीर व क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा याने प्रतिक्रिया दिली आहे.
रविचंद्र अश्विन याचा तब्बल दोन वर्षानंतर भारतीय वनडे संघात समावेश केला गेला. त्याबाबत आपल्या यूट्यूब चॅनल वर बोलताना चोप्रा म्हणाला,
“प्रत्येक विश्वचषकापूर्वी असेच घडते. गेल्या दोन-तीन विश्वचषकांवर नजर टाकल्यास अश्विनची कधीही एका वर्षासाठी निवड झालेली नाही, मग ती टी20 असो वा वनडे क्रिकेट. विश्वचषकापूर्वी अचानक भारतीय क्रिकेटला अश्विनची आठवण येऊ लागते. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात एकही ऑफस्पिनर नव्हता. अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर एक जागाही रिक्त झाली आहे. याच कारणामुळे वॉशिंग्टन सुंदर व्यतिरिक्त अश्विनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.”
आशिया चषक सुपर फोर फेरीच्या सामन्यादरम्यान अक्षर पटेल याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याला अंतिम सामन्यासाठी बोलावले गेले होते. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता या दोघांचाही समावेश भारतीय संघात केला गेला आहे.
मालिकेला कधी होणार सुरुवात?
या मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तसेच, मालिकेतील दुसरा सामना 24 आणि तिसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंड (30 सप्टेंबर) आणि नेदरलँड्स (3 ऑक्टोबर) संघांविरुद्ध विश्वचषकाचे सराव सामने खेळेल. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अभियानाची सुरुवात करेल.
(Aakash Chopra Slams Team Management On Ashwin Inclusion In ODI Sqaud)
हेही वाचाच-
सिराजची गरुडझेप! ODI रँकिंगमध्ये ‘एवढ्या’ स्थानांचा फायदा घेत बनला Topper, Asia Cup 2023नंतर मोठा बदल
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर