चेन्नई सुपर किंग्स संघाला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जाते. या संघाला वर आणण्यात एमएस धोनीचा मोलाचा वाटा राहिला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स संघाची कल्पना करणे जरा कठीणच आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने भविष्यवाणी केली आहे की, चेन्नई संघाला ३ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या धोनीची कारकीर्द लवकरच संपुष्टात येणार आहे.
यावर्षी धोनीच्या आयपीएल कारकिर्दीला लागणार पूर्णविराम?
क्रिकेटविश्वात अनेक दिग्गज क्रिकेटपटू आले आणि वय झाल्यानंतर किंवा त्यापूर्वीच त्यांनी निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या बाबतीतही काही वेगळं घडणार नाहीये. धोनीने गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानंतर त्याने सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पुढे २०२० मध्ये त्याने वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, २०२१ हा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचे हंगाम असू शकतो. २०२१ नंतर धोनी एक खेळाडू म्हणून आणि कर्णधार म्हणून आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती जाहीर करू शकतो.
धोनीबाबत दिग्गज क्रिकेटपटूने केलेली भविष्यवाणी
भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोपडा यांनी आयपीएल २०२२ बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, चेन्नई सुपर किंग्स संघाने धोनीला रिटेन नाही केले पाहिजे. जर असे झाले तर तो जास्तीत जास्त एक वर्ष आणखी खेळू शकतो.
तसेच आकाश चोपडा पुढे म्हणाले की, “कधी कधी मला असे वाटते की, चेन्नई संघाने धोनीला रिटेन नाही केले पाहिजे. पण धोनीशिवाय चेन्नई संघ म्हणजे आत्म्याविना शरीर असं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, तो आणखी एक वर्ष क्रिकेट खेळू शकतो. अनेकांनी असे म्हटले आहे की, हे धोनीचे शेवटचे वर्ष असणार आहे. परंतु मला असे वाटते की, धोनी आणखी एक वर्ष क्रिकेट खेळू शकतो. तो जरी ३ वर्ष खेळणार नसेल तरीदेखील चेन्नई सुपर किंग्स संघ धोनीला रिटेन करणार.”
महत्त्वाच्या बातम्या-
आजच्या लढतीत धोनीच्या किंग्सवर भारी पडणार रोहितची पलटण! ही आकडेवारी पाहून पटेल खात्री
दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड संघाची पाकिस्तानातून दुबईत सुखरुप लँडिग, ‘या’ दिवशी जाणार मायदेशी
आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचला होता इतिहास, पाहा तो क्षण