---Advertisement---

‘…तर मी पुढच्या वर्षी चेन्नईसाठी खेळू शकतो’, वाचा असं का म्हणाला आमिर खान

Amir-Khan-CSK
---Advertisement---

इंंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चा १५वा हंगाम सध्या शेवटच्या टप्पयात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या हंगामात अनेक संघांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यास अपयश आले आहे. त्यातील एक प्रमुख संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. चेन्नईला यंदाच्या आयपीएलमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यावर्षी चेन्नईच्या चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र चेन्नईच्या शेवटच्या सामन्यानंतर बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) याने केलेल्या वक्तव्यानंतर चेन्नईचे चाहते पुन्हा पुढील हंगामासाठी उत्सुक झाले आहेत.

इंस्टग्रामवर चेन्नईच्या अनेक फॅन पेजकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आमिर खान चेन्नई सुपर किंग्ज आणि प्रामुख्याने महेंद्रसिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) कौतुक करताना दिसत आहे. “व्हिसल पोडू सेना आणि चेन्नईच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार, तुम्हाला वाटले की मी तुमच्या टीममध्ये असू शकतो आणि हा एक मोठा सन्मान आहे. मी खूप भावूक झालो आहे. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद,” असे म्हणत आमिरने चेन्नईच्या चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत.

पुढे आमिर म्हणाला, “पिवळ्या जर्सीमध्ये खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. माहीच्या नेतृत्वाखाली खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. मी धोनीचा खूप मोठा चाहता आहे आणि मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटले की येथे एक व्यक्ती आहे जो बाहेरून शांत आहे, परंतु आत एक वादळ आहे, जे आपण पाहू शकत नाही. ”

“तुम्ही सर्व मला नेटमध्ये पाहू शकता आणि जर मी पुरेसा चांगला आहे, तर मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात कराल,” असे वक्तव्य आमिर खान याने त्या व्हिडिओ मध्ये केले आहे. असे असले तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आमिरने यासारखे व्हिडिओ बाकी फ्रँचायझींसाठी देखील बनवले आहेत. हा त्याच्यामी लाल सिंग चढ्ढा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आयपीएल २०२२ अंतिम सामन्यावेळी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यास अपयशी ठरला आहे. याआधी केवळ २०२० साली चेन्नईला अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मात्र २०२१ साली चेन्नईने जोरदार पुनरागमन करत आयपीएल २०२१ चे विजेतेपद मिळवले. आयपीएलच्या सर्वात जास्त सामन्यांमध्ये कर्णधारपद भुषवण्याचा बहुमान देखील चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे. सोबतच धोनीने पुढील वर्षी देखील आयपीएल खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी चेन्नईचा संघ पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वात चांगले पुनरागमन करेल अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: यॉर्करवर उत्तर शोधण्यासाठी परागने घेतली थेट मलिंगाचीच मदत, पाहा रियानचा खास ‘रियाज’

आयर्लंड दौऱ्यावर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला मिळणार भारतीय संघाची कमान? वाचा सविस्तर

आयपीएलनंतर आता दीपक हुडा-कृणाल पंड्या डोमेस्टिक क्रिकेटही खेळणार एकत्र?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---