---Advertisement---

बाबर आझमकडून विराट कोहलीने ‘ही’ गोष्ट शिकावी, माजी पाकिस्तानी खेळाडूचे मोठे भाष्य

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 1:59 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने क्रिकेटच्या तीनही प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे. तसेच त्याच्यासोबत नेहमीच पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आजमची तुलना केली जाते. अशातच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने विराट कोहली आणि बाबर आजम यांच्यात तुलना करत मोठे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

बाबर आजमने पाकिस्तान संघासाठी गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशातच माजी पाकिस्तानी गोलंदाज आकिब जावेद याने विराट कोहलीने बाबर आजमकडे पाहून तांत्रिक बाबींमध्ये सुधार करावा असे असे वक्तव्य केले आहे.

जावेदने म्हटले आहे की, “बाबर आजमच्या तुलनेत विराट कोहलीकडे जास्त प्रकारचे शॉट्स आहेत. परंतु त्याची एक कमतरता देखील आहे. जर चेंडू स्विंग होत असेल तर ऑफ स्टंपच्या जवळपास टाकलेल्या चेंडूवर त्याची बाद होण्याची शक्यता जास्त असते. मुख्यतः जेम्स अँडरसन विरुद्ध खेळताना.”

बाबर सचिन सारखा खेळतो…

तसेच जावेद पुढे म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही बाबरला खेळताना पाहता त्यावेळी तुम्हाला तो कुठल्याही क्षेत्रात कमकुवत असल्याचे जाणवत नाही. जसा सचिन तेंडुलकर कुठल्याही क्षेत्रात कमकुवत नव्हता. बाबर तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आणि चांगला आहे. जर त्याने कोहलीसारखे तंदुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित केले तर, तोही चांगला खेळाडू बनू शकतो. तसेच कोहली बाबरकडे पाहून आपल्या तांत्रिक बाबींमध्ये सुधार करू शकतो, जेणेकरुन तो कोणत्याही क्षेत्रात खेळताना फसणार नाही.”

भारताचा कर्णधार विराट कोहली हा आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या ८५७ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर बाबर आजम हा ८५२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच यादीत भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा ८२५ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2021: कोलकाता संघाची विजयाची सेंच्युरी पूर्ण; त्यांच्यापूर्वी केवळ ‘या’ दोन संघांनीच केला आहे हा कारनामा

भारीच ना भावा! १९ वर्षीय अब्दुल सामदने दिग्गज पॅट कमिन्सविरुद्ध ठोकलेले दोन गगनचुंबी षटकार पाहून व्हाल थक्क

अफलातून! अब्दुल सामदने बाऊंड्री लाईनजवळ मॉर्गनचा घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---