यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ यावर्षी विश्वचषकाचे यजमानपद भूषवेल. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याच्या मते जर गोष्टी सर्व ठरल्याप्रमाणे झाल्या, तर त्यांच्या संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू टी-२० विश्वचषकानंतर निवृत्ती घेऊ शकतात.
ऍरॉन फिंच (Aaron Finch) असे म्हटला की, नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ट्रॉफी जिंकणे त्याच्यासाठी चांगला अनुभव असू शकतो. कारण ऑस्ट्रेलिया संघ २०२१ मध्ये यूएईत जिंकलेल्या ट्रॉफीची रक्षा करण्यासाठी तयार आहे.
फिंच सध्या ३५ वर्षांचा आहे आणि त्यांच्या संघातील वरिष्ठ खेळाडूंचेही वय होत आहे. अशात यावर्षी खेळला जाणारा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असू शकतो. मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकादरम्यान, मॅथ्यू वेडने घोषणा केली होती की, आगामी आयसीसी स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. डेविड वॉर्नर देखील त्याची कसोटी आणि एकदिवसीय कारकीर्द मोठी बनवण्यासाठी टी-२० मधून निवृत्ती जाहीर करू शकतो.
आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ऍरॉन फिंच म्हणाला की, “जर अशा प्रकारची योजना बनवली गेली, तर हा सर्व गोष्टींवर पूर्णविराम लागेल. खेळात डावांची कहानी बनू शकते. मला वाटते की, स्वाभाविकपणे जेव्हा खेळाडू तिशीत पोहोचतात, तेव्हा असे होऊ शकते. डेवी (डेविड वॉर्नर) मात्र पुढे चालत राहतो. तो पुढचे १० वर्षही खेळू शकतो. मला वाटते की, तो खूप फिट आहे आणि स्पर्धेवर त्याचे खूप प्रेम आहे. तो स्वतःला आव्हान देणे चालूच ठेवतो.”
फिंच असेही म्हणाला की, “ही एक कठीण स्पर्धा होणार आहे. आपण पाहिले की, मागच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकाने त्यांच्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आणि तरीही नेट रन रेटमुळे क्लालीफाय करू शकले नाहीत. हे एवढे अवघड आहे की, तुम्हाला थोडी नशीबाचीही साथ पाहिजे असते.”
दरम्यान, मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाने चार सामने जिंकून देखील पहिल्या चार संघात त्यांना संधी मिळाली नव्हती. याच कारणास्तव फिंचने आगामी टी-२० विश्वचषक देखील कठीण असणार याचे संकेत दिले आहेत. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंमध्ये खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून विजेतेपद पटकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतच्या येण्याने ‘या’ स्टार सलामीवीराची जागा धोक्यात! दुसऱ्या टी२०त करू शकतो ओपनिंग
‘तो’ नसता तर, अजूनही टीम इंडियाची दुसऱ्या वनडे विश्वविजयाची प्रतिक्षा कायमच असती…!
टी२० च्या जमान्यात ५७ वर्षापासून अबाधित आहे ‘हा’ विश्वविक्रम, सेहवाग पोहोचला होता सर्वात जवळ