ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सलग दुसर्या वनडे सामन्यांत हार पत्करावी लागल्याने भारतीय संघ टीकेचा धनी झाला आहे. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरले. आखलेल्या योजनांची अंमलबजावणी गोलंदाज करू शकले नाही, असे मत कोहलीने व्यक्त केले होते.
मात्र, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने या मताशी असहमती दर्शविली आहे. नेहराच्या मते कोहलीने गोलंदाजीच्या क्रमात वारंवार बदल केल्याने संघाचे अधिक नुकसान झाले.
गोलंदाजांबाबत संयम दाखविण्याची अपेक्षा
क्रिकबझ या संकेतस्थळाशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, “विराट कोहली गोलंदाजांकडून झटपट परिणाम दिसण्याची अपेक्षा ठेवतो. त्याच्याकडे संयम कमी आहे. परिणाम दिसत नाही, अशी शक्यता वाटताच तो उतावळेपणाने लगेच गोलंदाजीत बदल करतो. मात्र, त्याला गोलंदाजांना योजना अंमलात आणण्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचे आहे.”
रविवारी (२९ नोव्हेंबर) झालेल्या सामन्याचे उदाहरण देताना नेहरा म्हणाला, “या सामन्यांत कोहलीने शमीला तीनषटके दिली, आणि त्यानंतर लगेच नवदीप सैनीला गोलंदाजीसाठी आणले. त्याला शमीला दुसर्या टोकाकडून आणायचे होते, हे जरी खरे असले तरी मग जसप्रीत बुमराहला नवीन चेंडूंवर केवळ दोन षटके देण्याचा निर्णय अनाकलनीय होता.”
विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दलही नेहराने आपले मत मांडले. पहिल्या वनडे सामन्यांतील कोहलीने खेळलेले आक्रमक फटके पाहून तो ३७५ ऐवजी ४७५ धावांचा पाठलाग करतो आहे, असे मला वाटत होते, अशी मजेशीर टिप्पणीदेखील नेहराने केली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत