नवी दिल्ली । भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वात चर्चेत राहिला आहे. कधी आपल्या टिकटॉक व्हिडिओंमुळे, तर कधी आपल्या इंस्टाग्रामवरील लाईव्ह सेशनमुळे. चहल केवळ आपल्या संघसहकाऱ्यांशी नव्हे तर सोबत खेळलेल्या खेळाडूंबरोबरच्या लाईव्ह सेशनचाही भाग राहिला आहे.
त्याला विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), युवराज सिंग (Yuvraj Singh) यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी खूप ट्रोल केले होते. तरी चहलवर याचा काही परिणाम झाला नाही. तो आताही सोशल मीडियवर सक्रिय आहे. नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एबी डिविलियर्सच्या (AB De Villiers) व्हिडिओ पोस्टवर कमेंट केली होती. त्यानंतर डिविलियर्सकडून त्याला चांगलेच उत्तर मिळाले.
डिविलियर्सचे चहलला प्रत्युत्तर
डिविलियर्सने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो डांस करताना दिसत होता. कोरोना व्हायरसदरम्यान (Corona Virus) जागरूकतेसाठी तो या व्हिडिओतून सुरक्षेचे धडे देत होता. त्याचवेळी चहलने (Yuzvendra Chahal) व्हिडिओखाली कमेंट करत लिहिले की, “भाऊ काय स्वॅग (स्टाईल) आहे.” चहलच्या या कमेंटरवर डिविलियर्सने प्रत्युत्तर देत लिहिले की, “बिहेव युवरसेल्फ म्हणजेच नीट वागायला शिक.”
यापूर्वी विराटने डिविलियर्सबरोबर चर्चा करताना चहलवर निशाना साधला होता. त्यावेळी विराट म्हणाला होता, “डिविलियर्स तु लॉकडाऊन दरम्यानचे चहलचे टिक-टॉकवरील व्हिडिओ पाहिले पाहिजेत. त्यात तो एका जोकरपेक्षा कमी दिसत नाही. त्याला पाहून असे मुळीच वाटणार नाही की, तो एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.”
याव्यतिरिक्त रोहितनेही चहलवर आपल्या वडिलांबरोबर डांस करतानाच्या व्हिडिओवरून निशाना साधला होता. तो म्हणाला होता, “चहल आपल्या वडिलांना डांस करायला सांगत आहे. तुला काही लाज वाटते की नाही.”
https://www.instagram.com/p/CA-FO88AlLV/?utm_source=ig_web_copy_link
चहल आणि डिविलियर्स आयपीएलमध्ये २०१४ पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून एकत्र खेळत आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अशा दिल्या कर्णधार विराट कोहलीने शुभेच्छा
-पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्यापुर्वी विराट- रोहितसह सर्वांना करावी लागणार ही गोष्ट
-कुठून येतात हे असले लोकं; कुणालाही क्रिकेट खेळायला बोलावतात, हे शब्द ऐकताच…