---Advertisement---

IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’

On: गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023 3:30 PM
MS Dhoni
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एबी डिव्हिलियर्स आनंद व्यक्त करत म्हणाला की, एमएस धोनी आणखी एक हंगाम खेळेल आणि सीएसकेने त्याला कायम ठेवल्याचे पाहून आनंद झाला. एबी डिव्हिलियर्सच्या म्हणण्यानुसार, एमएस धोनी आयपीएलमध्ये किती काळ खेळेल किंवा नाही याबद्दल कोणीही अंदाज लावू शकत नाही.

एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून गेल्या मोसमात खेळला आणि संघाला चॅम्पियनही बनवले. आता पुन्हा एकदा तो नव्या मोसमात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीने अद्याप निवृत्ती घेतलेली नाही आणि गेल्या मोसमात त्याला चेन्नईच्या चाहत्यांसमोर शेवटचा सामना खेळायला आवडेल असे त्याने सांगितले होते.

एबी डिव्हिलियर्स याने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान एमएस धोनीबद्दल विधान केले. तो म्हणाला, “मी एमएस धोनीचे नाव रिटेन्शन लिस्टमध्ये पाहिले आणि मला खूप आनंद झाला. गेल्या मोसमात हा त्याचा शेवटचा हंगाम असेल की नाही याची बरीच चर्चा झाली होती पण आता तो आणखी एका आयपीएल हंगामामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. एमएस धोनीची गोष्ट अशी आहे की तो नेहमी त्याच्या निर्णयांनी तुम्हाला आश्चर्यचकित करतो. कदाचित तो आणखी तीन हंगाम खेळेल? त्यानी तसे केले तर कोणास ठाऊक? पण त्याचे नाव रिटेन्शन यादीत पाहून बरे वाटते.”

चेन्नई सुपर किंग्सने लिलावापूर्वी अनेक खेळाडूंना सोडले आहे. बेन स्टोक्स आगामी हंगामासाठी उपलब्ध होणार नाही. अंबाती रायुडू निवृत्त झाला आहे आणि त्यामुळे चेन्नईमध्ये आता अनुभवी खेळाडूंची कमतरता भासेल असं बोललं जात आहे. (AB de Villiers makes big predictions about Dhoni’s IPL career Said That three more)

महत्वाच्या बातम्या

World Cup 2023 Final: पराभवामुळे निराश झाले गावसकर; म्हणाले, ‘आता निवडकर्त्यांना…’
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर अश्विनने संघातील वातावरणावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रोहित आणि विराट खूप…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---