अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ४ सामन्यांची कसोटी मालिका देखील ३-१ अशा फरकाने जिंकली. या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक होत आहे. यात एबी डिविलियर्सचाही समावेश आहे. त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
एबी डिविलियर्सने केले विराटचे कौतुक
डिविलियर्सने विराटच्या नेतृत्वाचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘या कसोटी सामन्यात विराटच्या नेतृत्वाने अक्षर, रिषभ आणि वॉशिंग्टन सारख्या युवा क्रिकेटपटूंना खेळण्याचे स्वातंत्र्य दिले आणि सामन्यावर पकड मिळवली. स्वत: लयीत नसतानाही आपल्या देहबोलीतून आणि उत्कटतेने आपल्या बरोबरच्या खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन देणे, हा एक चांगल्या नेतृत्वाचा गुण आहे.’
चौथ्या कसोटीत अक्षर पटेलने ९ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच रिषभ पंतने पहिल्या डावात शतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उतलला होता. तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ९६ धावांची खेळी केली.
Kohli’s leadership this test match allowed young guns like Axar, Rishabh and Washie to play with freedom and dominate the game. It takes a special leader to elevate other players around them through body language and passion when their personal performance has been down.
— AB de Villiers (@ABdeVilliers17) March 6, 2021
आयपीएलमध्ये एकत्र खेळतात डिविलियर्स आणि विराट
विराट आणि एबी डिविलियर्स मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रीमीयर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एकत्र खेळतात. त्यामुळे त्यांच्यात खूप चांगली मैत्री असून ते वेळोवेळी एकमेकांबद्दल कौतुक करत असतात.
असा जिंकला भारताने सामना
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या होता. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या होत्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
तसेच त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात रिषभ पंतने १०१ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ सुंदरने नाबाद ९६ धावा केल्या. तसेच रोहित शर्माने ४९ आणि अक्षर पटेलने ४३ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे भारताला ३६५ धावा उभारता आल्या. तसेच भारताने १६० धावांची आघाडीही घेतली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने ३ आणि जॅक लीचने २ विकेट्स घेतल्या.
यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव ५४.५ षटकात १३५ धावात संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! माजी रणजीपटूला ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक
“वॉशिंग्टनचे शतक हुकल्याने फार वाईट वाटतंय”, भारताच्या माजी खेळाडूचे ट्विट