भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. काही दिवसातच भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहे. भारतीय संघासोबत त्यांच्या परिवारालाही या दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका यांच्या सोबत या दौऱ्यावर आहे. विराट आणि आरसीबी संघाचा खेळाडू एबी डिविलियर्स यांच्या मैत्रीची किस्से जगभरात प्रसिद्ध आहेत. परंतु अनुष्का शर्मा आणि एबी डिविलियर्स याची पत्नी डेनियल डिविलियर्स यांच्या मैत्री बद्दल फारशी माहिती कोणाला माहिती नाही.
डेनियल डिविलियर्सने नुकताच सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने अनुष्का शर्मा आणि तिची मुलगी वामिका सोबत फोटो काढला आहे. खरं तर डेनियल डिविलियर्सने इंस्टाग्रामवर प्रश्न उत्तरांचा एक कार्यक्रम घेतला. त्यामध्ये एका चाहत्यांनी तिला विचारले की, ‘तुम्ही आणि अनुष्का शर्मा कधी हँग आऊट करता का?’ या प्रश्नावर डेनियल डिविलियर्सने हा फोटो शेअर केला. डेनियल डिविलियर्स सोबत तिची मुलगीही या फोटोमधून दिसून येत आहे.
डेनियल डिविलियर्सला विचारलेल्या प्रश्नावर हा फोटो तिने पोस्ट केला. आणि त्याच्या खाली एक खास कॅप्शन देखील दिले. तिने अनुष्काचे कौतुक करत खाली कॅप्शन लिहिले की, ‘अनुष्का खूपच प्रेमळ आहे. माझ्या ओळखीच्या लोकांमधील ती सगळ्यात छान व्यक्ती आहे. जर आम्ही एका देशात राहत असतो, तर या कल्पनेनेच मला खूप छान वाटत.’
वामिकाला पाहण्यासाठी चाहते झालेत आतुर
हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटोवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कारण विराट आणि अनुष्काने त्याच्या मुलीचा अजून एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाहीय. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीला सोशल मीडिया पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट विराटने स्वतः सांगितले आहे. मात्र चाहते वामिकाची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
विंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, अजून एका भावंडांच्या जोडीचीही निवड
या कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी
विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक