रविवार (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022 मधील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असेल. विराट मागील काही काळापासून फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना आशा आहे की, तो या सामन्यातून पुन्हा फॉर्ममध्ये यावा. त्याचवेळी दुसऱ्या एका अर्थाने त्यासाठी हा सामना अधिक खास असेल.
विराट कोहली रविवारी दुबईच्या मैदानावर उतरताच आपला 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना पूर्ण करेल. भारतासाठी खेळाच्या तिन्ही प्रकारातील शंभर सामने खेळणारा तो पहिला खेळाडू बनेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास त्याच्याआधी केवळ न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ही अभूतपूर्व कामगिरी केली होती.
विराटच्या या उपलब्धीबद्दल विराटचा मित्र असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज एबी डिव्हिलियर्स याने एक खास व्हिडिओ शेअर करत विराटचे अभिनंदन केले. स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एबी डिव्हिलियर्स बोलताना दिसतोय की,
.@ABdeVilliers17 has a special message for his close friend @imVkohli ahead of his 100th T20I! ❤️
DP World #AsiaCup2022 | #INDvPAK | #TeamIndia | #BelieveInBlue | #GreatestRivalry pic.twitter.com/nG0VbOo27O
— Star Sports (@StarSportsIndia) August 28, 2022
“क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 100 सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनल्याबद्दल मी माझा मित्र विराट कोहलीचे अभिनंदन करतो. ही खूप मोठी उपलब्धी आहे. आम्हाला तुझा सार्थ अभिमान असून, 100 व्या टी20 सामन्यासाठी मी तुला शुभेच्छा देतो. तुझा खेळ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत.”
विराट कोहली मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर त्याने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळले नाही. या आशिया चषकात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. भारताला आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया दौरा करत, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सध्याच्या काळात आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे!’ विराट कोहलीने बाबरवर केला कौतुकांचा वर्षाव
VIDEO: रसेलने ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स; केली युवी अन् पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी