ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात यजमान भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्षातील हा सर्वात मोठा सामना असल्याचे म्हटले जाते. उभय संघातील सामने हे नेहमीच काट्याचे राहिले आहेत. दोन्ही देशातील चाहते दोन्ही संघांना मैदानावर पाहण्यास नेहमीच उत्सुक असतात. मागील जवळपास दहा वर्षांपासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत. असे असताना पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक याने एक वेगळाच दावा केला आहे.
रज्जाक हा सातत्याने अनेक वादग्रस्त विधाने करण्यासाठी ओळखला जातो. नुकतेच त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सातत्याने पराभूत होत असे म्हटले आहे. तो म्हणाला,
“भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध 1997-1998 पासून जास्त सामने खेळला नाही. कारण, भारतीय संघाला पराभवाची भीती वाटत. यापूर्वी पाकिस्तान संघाची भारतावर नेहमीच सरशी राहिलेली. त्यावेळी पाकिस्तानचा संघ देखील मजबूत होता. आता परिस्थिती बदलली असून कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्यात सक्षम आहे.”
याच मुलाखतीत त्याने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. भारतीय संघाने अखेरच्या वेळी पाकिस्तानचा दौरा 2006 मध्ये केला होता. त्यानंतर 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ कधीही पाकिस्तानमध्ये गेला नाही. दोन्ही देशातील राजकीय संबंध बिघडल्याने हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळतात. पाकिस्तान संघाने अखेरच्या वेळी भारताचा दौरा 2013 मध्ये केला होता. त्यानंतर पाकिस्तान संघ भारतात केवळ टी20 विश्वचषक खेळला आहे.
(Abdul Razzaq Said India Always Lost Against Pakistan)
महत्वाच्या बातम्या-
‘लिविंग लिजेंड’ गावसकरांनी वाढदिवशी सांगितला आयुष्यातील अविस्मरणीय क्षण, म्हणाले…
एका दिवसात दोन सातारकर बनले विश्वविजेते! आदितीपाठोपाठ पार्थ साळुंखेने केला सुवर्णभेद