भारताचा युवा क्रिकेटपटू अभिमन्यु ईश्वरन (abhimanyu easwaran) याला मागच्या काही काळापूर्वी भारताच्या कसोटी संघात निवडले गेले होते. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. बंगाल संघासाठी तो देशांतर्गत क्रिकेट खेळतो. राष्ट्रीय संघाच्या जवळ गेला असला तरी, आयपीएलमध्ये मात्र त्याला आतापर्यंत कोणत्याच संघाने विकत घेतले नाहीय. अशात त्याने आता आयपीएल २०२२ विषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिमन्यू ईश्वरन मागच्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अद्याप त्याच्यावर कोणत्याच संघाने विश्वास दाखवलेला नाहीये. मागच्या ९ वर्षांपासून तो आयपीएल लिलावात सहभाग घेत आहे. परंतु, एकदाही त्याला कोणत्या संघाने विकत घेतले नाही. त्याचे देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन पाहता यावर्षी मेगा लिलावात त्याला एखादा संघ विकत घेईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना अभिमन्यू ईश्वरन म्हणाला की, “आयपीएल २०१४ पासून मी माझे नाव आयपीएल लिलावासाठी पाठवत आहे. पण कोणीच बोली लावली नाही. यावर्षी माझा ९ वा प्रयत्न आहे. मी माझे नाव सतत लिलावासाठी का पाठवतो ? कारण मला विश्वास आहे की, मी टी२० खेळाडूच्या रूपात खूप चांगला आहे आणि माझे आकडे त्याचे समर्थन करतात. जर पुन्हा एकदा मला कोणीच विकत घेतले नाही, तर हे माझ्यावर असेल की, मी स्वतःवर विश्वास ठेवाला पाहिजे. परंतु त्यासाठी देशांतर्गत क्रिकेट गरजेचे आहे.”
देशांतर्गत क्रिकेटवर बोलला ईश्वरन
मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मागच्या वर्षी रणजी ट्रॉफीही झाली नव्हती. या संदर्भात बोलताना ईश्वरन म्हणाला की, “कोरोना महामारीमुळे सर्वकाही बदलले. मी २६ वर्षाचा आहे आणि देशांतर्गत क्रिकेट नसल्यामुळे भविष्य अस्पष्ट झाले होते. देशांतील शेकडो खेळाडूंची अवस्था अशीच आहे.”
ईश्वरनने रणजी ट्रॉफीच्या मागच्या दोन हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते. यामध्ये त्याने १६ सामन्यांमध्ये ४६.६२ च्या सरासरीने १११९ धावा केल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर त्याची भारताच्या कसोटी संघात निवड झाली होती. भारतीय संघात निवड होण्याविषयी ईश्वरन म्हणाला की, “मागच्या वर्षी ३० मे रोजी मला भारतीय संघाची जर्सी मिळाली. तेव्हा मी मुंबईत विलगीकरणात होतो. मी दुपारच्या जेवणावेळी जर्सी घातली आणि रात्रीच्या जेवणावेळी काढून ठेवली. मला भारतासाठी खेळण्याच्या शर्यतीत सामील व्हायचे आहे.”
महत्वाच्या बातम्या –
हर्षा भोगलेंचा दावा; ‘हे’ दोन युवा फलंदाजच गाजवणार आयपीएलचा बाजार; जाणून घ्या नावे
युवराज सिंगने सांगितली ४ खेळाडूंची नावे, जे टीम इंडियातील निवडीसाठी सर्वाधिक पात्र
‘सचिन तेंडुलकरची मला दया येते’, शोएब अख्तर असं नक्की का म्हणाला? वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –