---Advertisement---

भारताकडून खेळला नाही, पण आयपीएलमध्ये चमकला हैदराबादचा पठ्ठ्या; संघसहकारी त्रिपाठीला पछाडत रचला खास विक्रम

On: रविवार, मे 22, 2022 11:38 PM
Abhishek-Sharma
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२च्या साखळी फेरीतील शेवटचा सामना रविवारी (२२ मे) खेळला गेला. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना खेळला गेला. पंजाबने हा सामना ५ विकेट्सने खिशात घातला. हैदराबादने या सामन्यात नाणेफिक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने एका खास विक्रम नावावर केला.

आयपीएलच्या या चालू हंगामात अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) ३२ चेंडू खेळला आणि यामध्ये ४३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि २ षटकार ठोकले. अभिषेकने या सामन्यात हैदराबाद संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. आयपीएल २०२२ हंगामात अभिषेक आता सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड (भारताच्या राष्ट्रीय संघाकडून न खेळलेला खेळाडू) खेळाडू बनला आहे.

या सामन्याच्या आधी राहुल त्रिपाठी चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू होता. पण रविवारी अभिषेकने त्याला मागे टाकले. अषिकेने चालू हंगामात आतापर्यंत ४२६ धावा केल्या आहेत. या एखाद्या अनकॅप्ड खेळाडूने चालू हंगामात केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तिलक वर्माने आतापर्यंत ४१३ धावा केल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे, ज्याने ३९७ धावा केल्या आहेत. २१७ धावांसह राहुल तेवतिया या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर २१५ धावांसह जितेश शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, उभय संघातील हा सामना साखळी फेरीतील शेवटचा सामना पंजाबने जिंकला असला, तरी हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.

आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारे अनकॅप्ड खेळाडू
४२६ धावा – अभिषेक शर्मा*

४१३ धावा – राहुल त्रिपाठी
३९७ धावा – तिलक वर्मा
२१७ धावा – राहुल तेवतिया
२१५ धावा – जितेश शर्मा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘असे’ आहे भारतीय गोलंदाजी आक्रमण, जडेजा-अश्विन जोडीवर फिरकीची मदार

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी राजस्थानचा ‘हा’ खेळाडू भारताच्या ताफ्यात सामील; मिळू शकते पदार्पणाची संधी

सातत्य फळाला आले! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी उमरान मलिकची भारतीय संघात निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---