इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला कालपासून (१३ ऑगस्ट) साऊथँम्पटन येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण पाकिस्तान संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. त्यांनी पहिल्या सामन्यातील आपला शतकवीर शान मसूदला तिसऱ्याच षटकात गमावले. त्याला केवळ १ धावेवर जेम्स अँँडरसनने बाद केले.
याव्यतिरिक्त पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीही २० धावा करत अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यादरम्यान पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज आबिद अली दुखापतग्रस्त झाला होता.
पाकिस्तान संघाचा डाव अलीने एका बाजूने सांभाळला. यादरम्यान त्याचे इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांकडून अनेक झेल सुटले आणि त्याला जीवदान मिळाले. परंतु यावेळी तो संघर्ष करताना दिसला. सामन्याच्या १८ व्या षटकात त्याला दुखापत झाली आणि तो जमिनीवरच झोपला.
खरं तर या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. हे त्याचे चौथे षटक होते. त्याने आपल्या चौथ्या षटकातील चेंडू अलीला सरळ दिशेने टाकला. पण चेंडू अलीच्या बॅटची कड घेत थेट त्याच्या एब्डॉमिनल गार्डला जाऊन लागला. चेंडू लागताच अली दुखापतीमुळे जमिनीवर झोपला.
अलीला दुखापतग्रस्त पाहून मैदानावर पाकिस्तानचे फिजिओ आले. यावेळी अलीला पाणी पाजण्यात आले आणि काही वेळातच तो पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज झाला.
अलीने १११ चेंडूंचा सामना करताना ६० धावा केल्या. या धावा करताना त्याने ७ चौकारही ठोकले. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाच्या पहिल्या डावात पहिल्या दिवसाखेर अलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-किंग्ज ११ पंजाबचा त्रिशतकवीर खेळाडू कोरोनातून बरा, खेळणार आयपीएल २०२०
-कोहलीला लॉर्ड्सवर क्लिन बोल्ड करण्याची स्वप्ने पाहणारी कोण आहे ही महिला?
-विराट कोहलीला राजस्थान रॉयल्समध्ये घेऊ, पण फक्त एका अटीवर
ट्रेंडिंग लेख–
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास