विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2024) मध्ये बंगाल विरूद्ध दिल्ली (Bengal Vs Delhi) संघात सामना झाला. या सामन्यात बंगालने 6 गडी राखून शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगालने 41.3 षटकांत सामना जिंकला. दरम्यान आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) खेळाडू ‘अभिषेक पोरेल’ने (Abishek Porel) धमाकेदार कामगिरी केली. त्याने नाबाद 170 धावा केल्या. तर ‘मुकेश कुमार’ने (Mukesh Kumar) बंगालसाठी धमाकेदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये ‘दिल्ली कॅपिटल्स’कडून (Delhi Capitals) खेळतात.
बंगालने टाॅस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. प्रत्युत्तरात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 272 धावा केल्या. यादरम्यान ‘वैभव कंदपाल’ने (Vaibhav Kandpal) 47 धावांची खेळी केली. ‘अनुज रावत’ने (Anuj Rawat) नाबाद 79 धावा केल्या. दरम्यान त्याने 9 चौकारांसह 2 षटकार ठोकले. तर ‘हिम्मत सिंग’ने (Himmat Singh) अर्धशतक झळकावले. त्याने 57 चेंडूत 60 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगालने 41.3 षटकांत 6 गडी राखून विजय मिळवला.
वास्तविक अभिषेक पोरेल (Abishek Porel) आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar) हे स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतात. आयपीएलमध्ये ‘दिल्ली कॅपिटल्स’कडून (Delhi Capitals) खेळतात. त्यांनी विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) सामन्यात दिल्लीविरूद्ध चमकदार कामगिरी केली. अभिषेकने 130 चेंडूत नाबाद 170 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 चौकारांसह 7 षटकार ठोकले. तर मुकेशने 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
Just a reminder of how good Abhi and Mukesh are! 😮💨 pic.twitter.com/359Fz2nqI1
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 21, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! भारत कधी आणि कुठे खेळणार सामने?
मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने गोलंदाजीत घातला धुमाकूळ, घेतल्या 5 विकेट्स
टी20 वर्ल्ड कपच्या विजयाने वर्ष खास बनवले, 17 वर्षांनंतर भारत विश्वविजेता ठरला