भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात आगामी 5 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघ कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसणार आहे. दरम्यान भारतीय संघापासून दीर्घकाळ दूर असलेल्या मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) संघात पुनरागमन झाले आहे.
इंडियन एक्सप्रेसने भारतीय संघाच्या आगामी 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघ निवडला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे असेल. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील पुनरागमन करेल. तर जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, केएल राहुल यांना या दौऱ्यावर विश्रांती दिली जाऊ शकते.
इंडियन एक्सप्रेसने निवडलेला भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्ती, वाॅशिंग्टन सुंदर
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा! आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर संघात मोठे बदल
बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा पुढे का ढकलली? कारण खूप ‘गंभीर’!
सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचं पदार्पणातच शतक! महाराष्ट्राची सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री