आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला आहे. हा लिलाव बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. भारतीय संघाचे माजी दिग्गज सलामीवीर आकश चोप्रा (Aakash chopra) यांनी या मेगा लिलावाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पाच गोलंदाजांची नावे सांगितली आहेत, जी आयपीएलच्या मेगा लिलावात सर्वाधिक महागडे ठरतील.
यावर्षी दोन नवीन फ्रेंचायझी आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद फ्रेंचायझी नव्याने सामील होणार असल्यामुळे येत्या हंगामात आठ ऐवजी १० संघ मैदानात असतील. याच पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील दिग्गजांवर मेगा लिलावात बोली लागताना दिसणार आहे. चाहत्यांमध्येही याविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा- ठरलं तर! आयपीएल २०२२ साठी तब्बल ५९० खेळाडूंचा होणार लिलाव; ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचा समावेश
आकाश चोप्रांनी मेगा लिलावासाठी त्यांना वाटणाऱ्या पाच सर्वात महागड्या गोलंदाजांची नावे सुचवली आहेत. परंतु यात आश्चर्याची गोष्ट ही आहे की, त्यांनी या पाच गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलला निवडले नाही. मध्यम गती वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मागच्या आयपीएल हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. आयपीएल २०२१ मध्ये हर्षल पटेलने सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या होत्या. वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्रावोनेही २०१३ मध्ये ३२ आयपीएल विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. आकाशने निवडलेल्या या पाच गोलंदाजांच्या यादीत दोन वेगवान गोलंदाज, एक गोलंदाजी अष्टपैलू आणि दोन फिरकी गोलंदाज आहेत.
आकाशने या यादीत प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, दीपक चाहर, राहुल चाहर आणि युजवेंद्र चहल यांना निवडले आहेत. आकाशने प्रसिद्ध कृष्णाची उंची आणि त्याचसोबत त्याच्या चेंडू सोडण्याच्या उत्कृष्ट पद्धतीचेही कौतुक केले. प्रसिद्ध कृष्णाला आकाशने या यादीत पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे. त्यानंतर आकाश म्हणाला की, आवेश खानकडे आयपीएलचे दोन उत्कृष्ट हंगाम आहेत, तसेच राहुल चाहरही यामध्ये सहभाग पाहिजे. आकाशने चाहरचे विशेष कौतुक केले आणि त्याला अप्रतिम गोलंदाज सांगितले. आकाश म्हणाला की दीपक नवीन चेंडूने विकेट घेण्यासाठी ओळखला जातो.
यादीत आकाशने दीपक चाहरला पहिल्या क्रमांकावर, युजवेंद्र चहलला दुसऱ्या क्रमांकावर, राहुल चाहरला तिसऱ्या, आवेश खानला चौथ्या आणि प्रसिद्ध कृष्णाला पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे. त्याच्या मते हे पाच गोलंदाज मेगा लिलावात सर्वात महागात विकले जातील.
महत्वाच्या बातम्या –
ठरलं तर! आयपीएल २०२२ साठी तब्बल ५९० खेळाडूंचा होणार लिलाव; ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचा समावेश
“इतकी उत्सुकता वाढवायची काय गरज” लखनऊ संघाच्या लोगोचे अनावरण होताच चाहत्यांनी केले ट्रोल
हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ व्यक्तव्यांनी निवडकर्त्यांनाच ठरवले खोटे? वाचा सविस्तर