इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक याने नुकतीच आयपीएल आणि ऍशेसची एकमेकांशी तुलना केली. ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील या शेवटच्या सामन्यात ब्रुक पहिल्या डावात इंग्लंडसाठी सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज ठरला. याच पार्श्वभूमीवर त्याला विचारल्या गेलेल्या प्रदर्शनाचे उत्तर इंग्लिश फलंदाजाने आयपीएलचा उल्लेख करत दिले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील हा शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (27 जुलै) सुरू झाला. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघाकडे 12 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात इंग्लंडने 283, तर ऑस्ट्रेलियाने 295 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी मध्यक्रमात फलंदाजीला आलेल्या हॅरी ब्रुक (Harry Brook) याने 91 चेंडूत 85 धावांची सर्वोत्तम खेळी केली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर ब्रुक माध्यमांसी संवाद सादण्यासाठी आला. यावेळी त्याला प्रश्न विचारला गेला की, “ऍशेस (Ashes 2023) ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्वत जास्त थकवणारी मालिका आहे का?”
पत्रकाराच्या या प्रश्नाचे उत्तर हॅरी ब्रुकने स्पष्टपणे नाही, असे दिले नाही. पण ऍशेसपेक्षा आयपीएलमध्ये खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अधिक तान असतो, असेही त्याने स्पष्ट केले. प्रश्नाचे उत्तर देताना ब्रुक म्हणाला, “हा एक चांगला प्रश्न आहे, पण ऍशेस या बाबतीत शक्यतो दुसऱ्या क्रमांकावर आहे. खरं सांगायचं तर आयपीएल (IPL) खूप कठीण आहे. ऍशेसदेखील कठीण राहिली आहे, पण जाहीर आहे की आम्हाला दोन सामन्यांमध्ये 10 दिवस किंवा एका आठवड्यापेक्षा जास्त काळ विश्रांती मिळते.”
दरम्यान, हॅरी ब्रुकच्या आयपीएल कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, त्याने यावर्षीच आयपीएलमध्ये पदार्पण केले. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने त्याला13.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. मात्र इंग्लंडचा युवा खेळाडू अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. आतापर्यंत खेळलेल्या 11 आयपीएल सामन्यांमध्ये ब्रुकने 190 धावा केल्या आहेत. यातील शंभर 100 धावा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्दच्या एकाच सामन्यात आल्या, जेव्हा त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक केले. आयपीएलमध्ये त्याची सरासरी धावसंख्या अघी 21 राहिली आहे. (According to Harry Brook, the IPL is a more physically and mentally exhausting tournament than the Ashes)
महत्वाच्या बातम्या –
रॉबिन उथप्पाचा T10मध्ये धुमाकूळ, 88 धावा ठोकत संघाला मिळवून दिला विजय
टी20 संघातून बाहेर असलेल्या विराट-रोहितबद्दल कॅरेबियन दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाला…