अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान याला टी२० मधील उत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानले जाते. जगातील विविध लीगमध्ये तो महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतो. तो आयपीएलच्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्स (Gujarat titans) संघाचा भाग आहे. त्याने टी२० मध्ये ३१२ सामन्यांत ४३६ विकेट्स घेतल्या आहेत. राशिदचे (Rashid Khan) मत असे आहे की तो लेग स्पिनर गोलंदाज नाही.
राशिद म्हणाला, “मी नेहमी स्वत:ला लेग स्पिनर मानत नाही, कारण फिरकीपटू मनगटाचा खुप वापर करतात आणि मी मनगटांचा तेवढा वापर करत नाही. मी माझ्या बोटांचा वापर करतो आणि म्हणूनच मी बोटंचा स्पिनर आहे. योग्य लेंथने सातत्याने गोलंदाजी केल्याने गोलंदाज रहस्यमयी बनतो, कारण त्यामुळे फलंदाजाच्या मनात भ्रम निर्माण होतो.”
जेव्हा रशीदला विचारण्यात आले की तो मनाने आक्रमक वेगवान गोलंदाज आहे की नवीन शोध घेण्याचा प्रयत्न करणारा आहे, तेव्हा तो म्हणाला, “मी ज्या वेगाने गोलंदाजी करतो, त्यामुळे मी एक ‘स्पिन फास्ट’ गोलंदाज आहे. एवढ्या वेगाने चेंडू फिरवणे खुप अवघड असते आणि त्यासाठी वेगळ्या प्रकारचे कौशल्य लागते, असे मला वाटते.”
तो म्हणाला, “मी ताशी ९६ ते १०० किमी वेगाने गोलंदाजी करतो. त्या वेगाने चेंडू फिरवणे अवघड आहे, परंतु वेग कमी करून ७०-७५ किमी प्रतितास इतक्या वेगाने मी गोलंदाजी करू शकतो.” २०१८ मध्ये अफगाणिस्तानसाठी रशिद खानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
त्याला विचारण्यात आले की, त्याने १५ वर्षानंतर टी२० मधून निवृत झाला तर तो खुश असेल का? यावर उत्तर देत रशिद खान म्हणाला, “१५ वर्षे खूप मोठा कालावधी आहे. तुमची कारकीर्द कधी किंवा कोणत्या परिस्थितीत संपेल, हे तुम्हाला माहीत नाही. आयुष्यात कधी काय घडेल हे सांगू शकत नाही, पुढील मिनिटाला काय होईल. हे तुम्हाला माहीत नाही.”
रशिदने अफगाणिस्तानसाठी आणखी कसोटी खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. तो म्हणाला, “मला कसोटीचे सामने खेळण्याची संधी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. मला या फॉरमॅटमध्ये खेळायला आवडते. मला आशा आहे की पुढील पाच वर्षात परिस्थिती बदलेल. जेणेकरून मी अफगाणिस्तानसाठी वर्षभरात किमान पाच ते दहा कसोटी सामने खेळू शकेन.” त्याने ५ कसोटी सामन्यात ३४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने ७७ सामन्यात ९४ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs RR: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ धाकड खेळाडूचे होणार पुनरागमन, पाहा संभावित संघ
आपल्याच जीवनावर बनवलेला चित्रपट पाहिल्यावर प्रविण तांबेला अश्रू अनावर, Video होतोय व्हायरल
अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक






