भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियासोबत बॉर्डर-गावसकर मालिका (Border Gavaskar Trophy) खेळण्यात व्यस्त आहे. यानंतर भारतीय संघ घरच्या भूमीवर इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची टी20, 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. दरम्यान वनडे मालिकेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचा भाग नसल्याचे सांगण्यात आले आहे. रोहिराट व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील वनडे मालिकेचा भाग असणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी इंग्लंडविरूद्धची मालिका ही भारतासाठी शेवटची वनडे मालिका असेल, ज्यामुळे खेळाडूंना वनडे स्वरूपाचा सराव करण्याची संधी मिळेल. (22 जानेवारी) पासून इंग्लंडविरूद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका सुरू होणार असून, त्यामध्ये पहिली 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर (6 फेब्रुवारी) पासून वनडे मालिका सुरू होईल. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे दोघेही फक्त वनडे, कसोटी सामन्यांमध्येच खेळताना दिसतात.
स्पोर्ट्स टाकवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये एका सूत्राने सांगितले की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकूट वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. याशिवाय बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे टी20 मालिकेतही संघाचा भाग असणार नाही. मात्र, याबात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टेस्ट …”, बॉक्सिंग डे कसोटीबाबत पॅट कमिन्सची प्रतिक्रिया समोर
विनोद कांबळीच्या तब्येतीत सुधारणा, हॉस्पिटलमधील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
IND vs AUS; विराट-रोहित नाही तर, भारताचा हा फलंदाज या बीजीटीमध्ये सर्वात विश्वासार्ह!