पुणे। जाएंटस अ संघाने आज पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत एनडीए युथ संघावर ९-१ असा दणदणीत विजय मिळविला. निखिल शेलारची हॅट्रिक त्यांच्या विजयात महत्वाची ठरली.
एसएसपीएमस मैदानावर आज झालेल्या द्वितीय श्रेणीतील बहुतेक सामन्यांचे निकाल एकतर्फी लागले. यात जाएंटसचा विजय सर्वात मोठा होता. नॅशनल युथ एफए आणि राहुल एफ ए या अन्य संघांनी एकतर्फी विजय नोंदविले.
ब गटातील सामनयात निखिलने पहिल्याच मिनिटाला संघाचे खाते उघडवले. त्यानंतर त्याने ११ आणि २९व्या मिनिटाला गोल केले. त्यांच्याकडून अन्य गोल जीवन नलगे (९वे मिनिट), आदेश सोनकांबफे (१४, ५८वे मिनिटे), कडू (१५वे), अभिजित म्हसवडे (३७ आणि ५३नवे मिनिट) यांनी केले. एनडीएकडून एकमात्र गोल हरिकृष्णाने पेनल्टीवर केला.
याच गटातील अन्य सामन्यात नॅशनल युथ एफ ए संघाने बोपोडी इलेव्हन संघाचा ४-१ असा पराभव केला. धनंजय लडकत याने १०व्या , तन्मय इंगळे याने १२व्या मिनिटाला गोल केले. त्यानंतर वैभवने ३५ आणि ५९व्या मिनिटाला दोन करून संघाची आघाडी वाढवली. स्टिफन काटे याने २२व्या मिनिटाला बोपोडीसाठी एक गोल केला.
राहुल एफए संघाने ग्रीन बॉक्स चेतक ब संघाचा ३-० असा पराव केला. या शेंडेने १८व्या मिनिटाला गोल केल्यावुर शशांत तिवापरीने ४२ आणि ५७व्या मिनिटाला दोन गोल केले.
सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या तृतिय श्रेणीच्या सामन्यात पुणेरी वॉरियर्सने आपले आगेकूच कायम राखताना कन्सीएंट एफए चा ७-० असा धुव्वा उडवला. विवेक घेनांद याने तिसऱ्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर आदित्य नलानवडे याने ८, ओमकार रसाळने १२, संकेत डोंगरेने २७, प्रियेश पठाणे ४०, महाराणा रानडे याने ५१ आणि पियुष कुलकर्णी याने ६१व्या मिनिटाला गोल केले.
ड गटातील सामन्यात अशोका इलेव्हन संघाला खडकी ब्ल्यूजने १-१ असे बरोबरीत रोखले. अशोका संघाच्या श्रीकांत महाडिकने १५व्या मिनिटाला गोल केल्यावर शोएब सलमाणी याने २१व्या मिनिटाला गोल करून खडकीला बरोबरी साधून दिली.
निकाल
सप महाविद्यालय – तृतिय श्रेणी
ई गट नॉईजी बॉईज ३ (आयुज कुटे १ले, सागर पाटिल २३वे. दिनेश राठोड ३७वे मिनिट) वि.वि. स्निग्मय एफसी ०
नाझ एफसी ० बरोबरी वि. सासवड एफसी ०
एफ गट – परशुरामियन्स सी २ (साहिल परदेशी १४वे, हर्षल कांगडे ५८वे मिनि) बरोबरी वि. थंडर कॅटस ब २ (अॅंडी २५वे-पेनल्टी, रामेश्वर पी ६०+२वे मिनिट)
पुणेरी वॉरियर्स ७ (विवेक घेनांद ३रे, आदित्य नलावडे ८नवे, ओमकार रसाळ १२वे, संकेत डोंगरे २७वे, प्रियेश पठाण ४०वे, महाराणा रानडे ५१वे, पियुष कुलकर्णी ६०+१ वे मिनिट) वि.वि. कन्सीएंट एफसी ०
ड गट – इन्फंटस एफसी ७ (सुस्नेश यादव ३रे, मेल्विन अॅन्थोनी २५, ३५वे मिनिट, सचिन सल्याने ४३वे, इलियाझ नायडू ३३वे मिनिट, सॅम्युएल डॅनिएल ४९वे, ५३वे मिनिट) वि.वि. भोर एफसी २ (अक्षय १८वे, स्वरुप ५६वे मिनिट)
एसएसपीएमएमस मैदान – द्वितीय श्रेणी
ब गट – राहुल एफ ए ३ (आनंद शेंडे १८वे, शशांक तिवारी ४२वे, ५७वे मिनिट) वि.वि. ग्रीनबॉक्स चेतक ब ०
जाएंटस ए – ९ (निखिल शेलार १ले,११वे, २९वे मिनिट, जीवन नलगे ९वे, आदेश सोनकांबळे १४, ५८वे, अक्षय कडू १५वे, अभिजित म्हसवडे ३७, ५३वे मिनिट) वि.वि. एनडीए युथ स्पोर्टस क्लब १ (हरिकृष्ण ४८वे मिनिट -पेनल्टी)
नॅशनल युथ एफ ए ४ (धनंजय लड़कत १०वे, तन्मय इंगळे १२वे, वैभव जोशी ३५, ५९वे मिनिट) वि.वि. बोपोडी एफ ए१ (स्टिफन काटे २२वे मिनिट)
सी गट – उत्कर्ष क्रीडा मंच ब (पुढे चाल) वि. संगम यंग बॉईज
ड गट – अशोका इलेव्हन १ (श्रीकांत महाडिक १५वे मिनिट) बरोबरी वि. खडकी ब्ल्यूज १ (शोएब सलमानी २१वे मिनिट)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुणेरी वॉरियर्स, अस्पायर एफसीचे चमकदार विजय
रेड कार्डच्या स्पर्धेत डायनामाईटसचा युनिक वानवडीवर विजय
रेड कार्डच्या स्पर्धेत डायनामाईट्सचा युनिक वानवडीवर विजय