‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये होते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच इंडियन प्रीमिअर लीगमध्येही एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. आता सचिनच्या पावलांवर पाऊल टाकत अर्जुन तेंडुलकर यानेही आयपीएल 2023 स्पर्धेत पदार्पण केले आहे. हंगामातील 22वा सामना अर्जुनसाठी खूपच खास ठरला. त्याला मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने मुंबईकडून गोलंदाजीची सुरुवात केली. त्याला विकेट घेता आली नाही, पण तो सचिनच्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याच्या पदार्पणावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी ट्वीट करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या पदार्पणावर त्याला शुभेच्छा देत ट्वीट केले. यावर आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
गांगुलीची पोस्ट
गांगुलीने ट्वीट करत लिहिले की, “अर्जुनला मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांना अभिमान वाटला पाहिजे… खूप खूप शुभेच्छा.”
So happy to see Arjun play for mumbai .. The champion dad must be so proud .. wish him all the best @sachin_rt
— Sourav Ganguly (@SGanguly99) April 16, 2023
गांगुलीच्या या ट्वीटवर सचिनने प्रतिक्रिया देत लिहिले की, “एका वडिलाकडून धन्यवाद. दादी!” खरं तर, गांगुलीला सचिन प्रेमाने दादाच्या ऐवजी दादी बोलतो.
Thank you from a dad, dad-i! 😄 https://t.co/Cn5Bx2z3c5
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 18, 2023
अभिषेक बच्चनचे ट्वीट
दुसरीकडे, अभिषेक बच्चन याने ट्वीट करत लिहिले की, “मुंबई इंडियन्स चांगली खेळली. मुंबईच्या ताफ्यात एका तेंडुलकरला परत पाहून चांगले वाटले. अर्जुन तेंडुलकर पदार्पणासाठी तुला शुभेच्छा. सचिन तेंडुलकर तुम्हाला खूप अभिमान वाटला पाहिजे.”
Well played @mipaltan
And so wonderful to see a #Tendulkar back in the #MI line-up. Congratulations #ArjunTendulkar on your debut. @sachin_rt must be so proud. 💙— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) April 16, 2023
अभिषेकच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना सचिनने लिहिले की, “धन्यवाद अभिषेक. आणि यावेळी एका तेंडुलकरने फलंदाजीऐवजी गोलंदाजीने सुरुवात केली. जेव्हा आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली खेळायचो, तेव्हा कदाचित तू त्याच्या गोलंदाजीचा सामना करणारा पहिला व्यक्ती होता.”
Thank you, Abhishek…and this time, a Tendulkar opened the bowling instead of batting.
Also, you were probably the first one to face his bowling when we used to play below our building! 😄 https://t.co/sKqSTTH2KJ— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 18, 2023
अर्जुनच्या पदार्पणावर सचिनची पोस्ट
अर्जुनच्या पदार्पणावर वडील सचिन तेंडुलकर यानेही भावूक पोस्ट शेअर केली होती. मुलगा अर्जुनला शुभेच्छा देत सचिनने ट्वीट करत लिहिले की, “अर्जुन, आज तू एक क्रिकेटर म्हणून तुझ्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल ठेवले आहे. तुझ्या वडिलांच्या रूपात, जो तुझ्यावर प्रेम करतो आणि खेळाप्रती आवड आहे, मला माहितीये की, तू खेळाला तो सन्मान देणे सुरू ठेवशील, ज्याचा तो हक्कदार आहे. याऐवजी हा खेळ तुला प्रेम देईल. तू इथपर्यंत पोहोचण्यात खूप मेहनत घेतली आहे. मला विश्वास आहे की, तू अशी कामगिरी करणे सुरूच ठेवशील. ही एक खूपच सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. शुभेच्छा.”
Arjun, today you have taken another important step in your journey as a cricketer. As your father, someone who loves you and is passionate about the game, I know you will continue to give the game the respect it deserves and the game will love you back. (1/2) pic.twitter.com/a0SVVW7EhT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 16, 2023
अर्जुन तेंडुलकर याने कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 2 षटके गोलंदाजी करताना 17 धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा 8.50 इतका होता. विशेष म्हणजे, आयपीएल 2023च्या 25व्या सामन्यात हैदराबादविरुद्धही अर्जुनला त्याच्या दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली. आता इथे तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Actor abhishek bachchan and sourav ganguly tweet on arjuns debut father sachin gives funny reply)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित
हृदय पिळवटून टाकणारी बातमी! क्रिकेट खेळताना युवकावर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून हत्या