---Advertisement---

नताशाने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवरुन पुन्हा रंगली हार्दिक आणि त्याच्या मुलाची चर्चा

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 8:54 AM
---Advertisement---

क्रिकेट विश्वात एकिकडे भारत-इंग्लंड कसोटी सामन्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे नताशा आणि हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्य याच्या फोटोची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. अभिनेत्री आणि भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याची नताशा स्टॅनकोविचने आपल्या मुलाचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे आणि चाहत्यांना देखील तो इतका आवडला आहे की त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

याअगोदर काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या आणि नताशाने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात अगस्त्य पहिल्यांदा विमान प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या मांडीवर बसून तो हा प्रवास करताना अतिशय आनंदी दिसत आहे. परंतु या दुसऱ्या फोटोची चर्चाच काही वेगळी आहे, या चित्रात हार्दिक पंड्या आपल्या मुलाकडे झुकत असताना तो गोड हसत आहे आणि पंड्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे.

सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांच्या सुद्धा तो पसंतीस उरत आहे. या फोटोत मुलगा आणि वडील यांच्या नात्याची सुंदर अशी झलक पहावयास मिळते.

Screengrab: Instagram/Nataša Stanković

नताशाने ३० जुलै २०२० रोजी अगस्त्यला जन्म दिला असून, नताशा आणि हार्दिकने नताशाच्या प्रेग्नेंसी आणि साखरपूड्याची बातमी इन्स्टाग्रामवर शेयर केली होती.

सध्या हार्दिक पंड्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघाचा सदस्य आहे. मात्र, त्याला पहिल्या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. हार्दिक सध्या त्याच्या फिटनेसवरही काम करत आहे.

काही दिवसांपूर्वीच हार्दिक पंड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ : लिलावासाठी तब्बल ११ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी; ‘या’ दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश

गुगल गंडल! ६० वर्षीय रवी शास्त्रीचं गुगलवरील वय चक्क दुप्पट, खोट वाटतंय तर सर्च करुन पाहा

सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---