---Advertisement---

सेंच्युरीनंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पण अनुष्काच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…

On: सोमवार, जानेवारी 16, 2023 1:41 PM
Virat-Kohli-And-Anushka-Sharma
---Advertisement---

रविवारी (दि. 15 जानेवारी) भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने तिरुवनंतपुरम येथे शतक झळकावत विक्रमांची भींतच उभी केली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ठोकलेले त्याचे 46वे आंतरराष्ट्रीय शतक होते. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला 390 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले होते. या सामन्यात भारतीय संघाने तब्बल 317 धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने वनडे मालिका 3-0ने आपल्या नावावर केली. विराटच्या शतकानंतर त्याच्यावर चोहो बाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाला. यामध्ये सर्वात लक्षवेधी प्रशंसा विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिची होती.

शानदार शतकानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Virat Kohli Wife Anushka Sharma) हिने सोशल मीडियावर विराटचे तोंडभरून कौतुक केले. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने टीव्हीचा स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) त्याची बॅट आणि हेल्मेट हवेत उचलताना दिसत होता. तसेच, तो आभाळाकडे पाहून आपल्या शतकाचा आनंद साजरा करत होता.

अनुष्काने हा फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर करत कॅप्शन दिले होते की, “काय माणूस आहे…शाब्बास… काय कमालीची खेळी साकारलीस.”

Anushka-Sharma-Insta-Story
Photo Courtesy: Instagram/anushkasharma

विराटची खेळी
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने श्रीलंकेविरुद्ध चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 110 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 166 धावा कुटल्या. हे त्याचे श्रीलंकेविरुद्धचे वनडे क्रिकेटमधील 10वे शतक होते. विशेष म्हणजे, मागील चार डावांमधील विराटचे हे तिसरे शतक होते. तसेच, या मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक होते. विराटने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याचे उत्तर श्रीलंकेच्या गोलंदाजांकडे नव्हते.

विराटच्या धावांच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेपुढे 391 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघ 73 धावांवरच गडगडला. त्यामुळे भारतीय संघाने 317 धावांनी वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला.

अनुष्का प्रत्येक वेळी विराटची प्रशंसा करताना दिसली आहे. तीन अनेकदा विराटच्या समर्थनार्थ किंवा त्याचे कौतुक करणारी पोस्ट करत असते.

https://www.instagram.com/p/Cmnx06YJm2a/?hl=en

अनुष्का बनणार ‘झूलन गोस्वामी’
अनुष्का लवकरच भारतीय संघाची माजी स्टार गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. भारतीय महिला संघाची स्टार गोलंदाज असलेल्या झूलनच्या आयुष्यावर बनत असलेल्या ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये अनुष्का मुख्य भूमिकेत आहे. मागील वर्षी टी20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामन्याला तिने तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम सामना घोषित केले होते. (actress anushka sharma praised husband virat kohli after he scored century against sri lanka)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला यशस्वी बनवण्यात ‘या’ तिघांचा मोलाचा वाटा; कोहलीही म्हणाला, ‘त्यांच्यामुळेच मी आज इथे…’
श्रीलंकेला तर धुतलं, आता टीम इंडियापुढं न्यूझीलंडचं आव्हान; वाचा वनडेत कोण कुणावर आहे वरचढ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---