सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 295 धावांनी धमाकेदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा कसोटी सामना (6 ते 10 डिसेंबर) दरम्यान ॲडेलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) ऑस्ट्रेलियाला सल्ला दिला आहे.
ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ॲडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जास्त वेळ क्रीजवर राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) संघात कायम ठेवण्याचेही त्याने समर्थन केले आहे.
भारताने 295 धावांनी जिंकलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) फ्लाॅप ठरले. आता दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र असेल, जी शुक्रवारी (6 डिसेंबर) पासून ॲडेलेडमध्ये खेळला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये ॲडम गिलख्रिस्ट (Adma Gilchrist) म्हणाला, “मार्नसवर हे करण्याची जबाबदारी होती (क्रिझवर राहून) आणि त्याने 50 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना करत चांगली कामगिरी केली. जर तुम्ही कसोटी डावात 50 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला, तर तुम्ही पुढे जात आहात. योग्य दिशेने धावा काढण्याचा मार्ग त्यांना सापडला नाही आणि कदाचित सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू हे प्रयत्न करू शकतील, परंतु जोखीम घेऊनच तुम्ही यशस्वी होऊ शकता.”
मार्नस लाबुशेन गेल्या काही काळापासून धावा काढण्यासाठी झगडत आहे, पण गिलख्रिस्टने त्याला संघात ठेवण्याचे समर्थन केले आहे. तो म्हणाला, “तो एक अतिशय कुशल फलंदाज आहे याची त्याला आठवण करून द्यायला हवी. मला खात्री आहे की त्याच्या आजूबाजूचे लोक आधीच असे करत आहेत. त्याला त्याच्या सरावावर विश्वास ठेवायला हवा.”
महत्त्वाच्या बातम्या-
SMAT; आरसीबीच्या 2 धुरंधरांनी फलंदाजीत केला कहर, गोलंदाजांवर गाजवले वर्चस्व
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती…!
SMAT; आयपीएल लिलावात अनसोल्ड ठरलेल्या स्टार खेळाडूने झळकावले शानदार शतक