भारतीय क्रिकेट संघ आगामी वनडे विश्वचषकाच्या तयारीत आहे. यावर्षीचा विश्वचषक भारतात खेळला जाणार असून, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जातेय. असे असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्ट याने भारतीय संघ व्यवस्थापनाला एक सल्ला दिला आहे.
आगामी विश्वचषकात भारतीय संघाने सचिन तेंडुलकर व एमएस धोनी या भारताच्या माजी क्रिकेटपटूंना ड्रेसिंग रूममध्ये घ्यावे, अशी संकल्पना गिलख्रिस्ट याने मांडली. तो म्हणाला,
“बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी यांना भारतीय खेळाडूंसोबत वेळ घालवण्यासाठी विचारायला हवे. त्यांचा अनुभव त्यांनी खेळाडूशी शेअर करायला काही हरकत नाही. युवराज सिंग देखील यासाठी चांगला पर्याय आहे.”
निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकर सातत्याने मुंबई इंडियन्सचा आयडल म्हणून दिसतो. तर धोनीने 2021 टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा मेंटर म्हणून भूमिका निभावलेली.
आगामी वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. यजमान पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. भारताला आपला पहिला विश्वचषक सामना बलाढ्या ऑस्ट्रेलियासोबत 8 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारतातील दहा शहरांमध्ये विश्वचषकातील सामने खेळले जाणार आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
(Adam Gilchrist Suggest Bring MS Dhoni And Sachin Tendulkar For ODI World Cup In Dressing Room)
हेही वाचाच-
नंबर 1 वनडे गोलंदाज बनतात सिराजला आठवले वडील, इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत…
शाब्बास करूण! इंग्लंडच्या भूमीवरही बोलली पठ्ठ्याची बॅट, ठोकले दमदार शतक