मंगळवारी (दि. 03 जानेवारी) बिग बॅश लीग 2022-23 स्पर्धेतील 27वा सामना मेलबर्न स्टार्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स संघात खेळला गेला. हा सामना रेनेगेड्स संघाने 33 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्याच्या निकालापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सर्वाधिक रंगली. ती म्हणजे, फलंदाजाला मंकडींगरीत्या बाद करण्याच्या प्रयत्नाची. नेमकं काय आहे हे प्रकरण चला तर सविस्तर जाणून घेऊया…
मेलबर्न स्टार्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Stars vs Melbourne Renegades) संघातील या सामन्यात मजेशीर घटना घडली. स्टार्स संघाचा कर्णधार आणि गोलंदाज ऍडम झम्पा (Adam Zampa) याने चपळतेने नॉन स्ट्रायकर फलंदाजाला मंकडींगरीत्या बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीव्ही पंचांनी याला नाबाद करार दिला. खरं तर, यादरम्यान झम्पाकडून एक चूक झाली होती.
मेलबर्न रेनेगेड्स संघाच्या डावादरम्यान 20व्या षटकात झम्पा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर फलंदाज टॉम रॉजर्स (Tom Rogers) क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजाने त्याला मंकडींगरीत्या बाद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीव्ही पंचांनी रिप्लेनंतर फलंदाजाला नाबाद करार दिला. खरं तर, झम्पाला नॉन स्ट्रायकर बाजूला रॉजर्सला बाद करण्याचा नियम माहिती नव्हता. त्यामुळे त्याची चपळता यावेळी फसली.
Spicy, spicy scenes at the MCG.
Not out is the call…debate away, friends! #BBL12 pic.twitter.com/N6FAjNwDO7
— KFC Big Bash League (@BBL) January 3, 2023
नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार, गोलंदाज कोणत्याही नॉन स्ट्रायकर फलंदाजाला हात फिरवण्यापूर्वीच धावबाद (मंकडींग) करू शकतो. झम्पाला हा नियम माहिती नव्हता आणि त्याच्याकडून ही चूक घडली.
सामन्याचा आढावा
झम्पाने या सामन्यात चार षटके फेकली. यादरम्यान त्याने 18 धावा देत फक्त 1 विकेट घेतली. मात्र, त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मेलबर्न रेनेगेड्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 141 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान पार करताना मेलबर्न स्टार्स संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 108 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना रेनेगेड्स संघाने 33 धावांनी जिंकला. (adam zampa mankad run out attempt fail in big bash league see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडियाच्या दोन धुरंधरांचे टी20 पदार्पण
आईसलँडवाल्यांची एवढी हिम्मत! ‘किंग’ कोहलीचा खुलेआम अपमान