India vs England Test Series: हैदराबादमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 25 जानेवारीपासून या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. रोहितच्या संघात काही युवा खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. आवेश खान आणि मुकेश कुमार या संघात आहेत. या सामन्याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडविरुद्ध रोहितला गोलंदाजांचा चतुराईने वापर करावा लागेल, असं त्यांचं मत आहे.
भारती संघाने मुकेश कुमार आणि आवेश खान यांचा संघात समावेश केला आहे. पण त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही यावर काहीही सांगता येणार नाही. भारताकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे वरिष्ठ गोलंदाज आहेत. यासोबतच संघ फिरकीपटूंनाही संधी देणार आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. रोहित पहिल्या सामन्यासाठी रविचंद्रन अश्विनचाही विचार करू शकतो.
भारत-इंग्लंड कसोटी सामन्याबाबत गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेमधील एका बातमीनुसार, गावसकर म्हणाले, “कर्णधार म्हणून रोहित शर्माला आपल्या गोलंदाजांचा चतुराईने वापर करावा लागेल. हैदराबादची खेळपट्टी पाहिली तर साधारणपणे इथे फारसा चेंडू वळत नाही. अशा परिस्थितीत गोलंदाजांचा हुशारीने वापर करावा लागणार आहे.”
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये भारतीय संघाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. भारताने आतापर्यंत येथे 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 4 सामने जिंकले आहेत. तिथे एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. या मैदानावर भारतीय संघाने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. (Advice from former Indian player to Rohit, told what to do against England)
हेही वाचा
IND vs ENG: धावा करण्यात सचिन, विकेट घेण्यात अँडरसन अव्वल; भारत-इंग्लंड कसोटी इतिहासातील 10 मोठे विक्रम
पाकिस्तानचा दिग्गज बनला कोहलीचा फॅन, वाचा विराटला शतकातील सर्वोत्तम फलंदाज का म्हणाला