अबुधाबी| एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन (एएफसी) आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत आज (6 जानेवारी) भारत विरुद्ध थायलंड असा सामना होणार आहे. आठ वर्षांच्या खंडानंतर भारताने या खंडीय स्पर्धेतील स्थान नक्की केले. त्यामुळे भारताच्या सलामीविषयी उत्सुकता आहे.
अबुधाबीतील अल नाह्यान स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता असल्याचे दाखवून देण्याचा भारताचा प्रयत्न राहील.
भारताचा अ गटात समावेश आहे. थायलंडशिवाय बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती हे भारताचे प्रतिस्पर्धी आहेत.मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या संघासमोरील आव्हान मात्र खडतर असेल.
भारताने तब्बल 33 वर्षांपूर्वी थायलंड विरुद्ध पहिला विजय मिळवला आहे. 1986ला कुलाला लंमपूरमध्ये झालेल्या मेर्डेके कप स्पर्धेत भारताने थायलंडला पराभूत केले होते.
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. यामध्ये थायलंड 11 सामने जिंकत आघाडीवर आहे. तर भारताने 4 सामन्यांत विजय मिळवला असून 6 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
आज (6 जानेवारी) दोन्ही संघ नऊ वर्षानंतर समोरा-समोर येणार आहे. याआधी थायलंड विरुद्ध झालेल्या दोन सामन्यात भारताला 2-1 आणि 1-0 असे पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
फिफा क्रमवारीत भारत 97व्या तर थायलंड 118व्यास्थानावर आहे.
भारत विरुद्ध थायलंड या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 3 आणि हॉटस्टार होणार आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संभाव्य संघ:
गोलकिपर- गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, अरिंदम भट्टाचार्य, विशाल केथ
डिफेंडर्स- प्रितम कोटल, सार्थक गोलूइ, संदेश झिंगन, अनस एदाथोडिका, सलाम रंजन सिंग, सुभासिश बोस, नारायन दास, लालरूथ्थारा
मिडफिल्डर्स- उदांता सिंग, जॅकीचंद सिंग, प्रोणय हल्दर, विनीत राय, रोवलीन बोर्जेस, अनिरूध थापा, जेर्मन पी सिंग, आशिक कुरूनियान, हलिचरण नारझरय, लल्लीझुआला छांगटे,
फॉरवर्ड- सुनिल छेत्री (कर्णधार), जेजे लापेखलुआ, सुमित पस्सी, फारूख चौधरी, बलवंत सिंग, मानवीर सिंग
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहलीच्या टीम इंडियाने सहाव्यांदा दिला विरोधी संघाला फॉलोऑन, काय आहे याआधीचा इतिहास?
–कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर
–थायलंडविरुद्ध भारताच्या सलामीची उत्सुकता
–टीम इंडियाने ६२२ धावांचा डोंगर उभारण्यात पाकिस्तानच्या या तीन गोलंदाजांचेही मोठे योगदान