शाकिब अल हसन याच्या नेतृत्वातील बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा तिसरा सामना शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) खेळला जात आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये पार पडत आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. शाकिबचा हा निर्णय खेळाडूंनी प्राथमिकरीत्या योग्य ठरवला. तसेच, स्टार खेळाडूंनी सजलेल्या अफगाणिस्तानला अवघ्या 200 धावांच्या आत रोखले.
या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 37.2 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 156 धावा केल्या. यावेळी एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही.
ICC Men's Cricket World Cup 2023
Bangladesh 🆚Afghanistan 🏏Bangladesh need 157 Runs to Win
Photo Credit: ICC/Getty#BCB | #AFGvBAN| #CWC23 pic.twitter.com/j1FDvPqy9H
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 7, 2023
अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 62 चेंडूंचा सामना करताना 47 धाव केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त इब्राहिम जादरान आणि अझमतुल्लाह ओमरजाई यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. यांच्याव्यतिरिक्त इतर एकालाही 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) फक्त 18 धावांवर बाद झाला. रहमत शाह यानेही कर्णधाराइतक्याच 18 धावांचे योगदान दिले. अष्टपैलू राशिद खान याला 9 धावांवर विकेट गमवावी लागली.
यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाज चमकले. एक म्हणजे कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि दोन म्हणजे मेहिदी हसन मिराज होय. या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट नावावर केल्या. मात्र, हसनने जास्त धावा खर्च केल्या नाहीत. त्याने 9 षटकात 25 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. तसेच, शाकिबने 8 षटकात 30 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त शोरिफुल इस्लाम याने 2 विकेट्स घेतल्या, तर तस्कीन अहमद आणि मुस्तफिजूर रहमान यांनीही प्रत्येकी 1 विकेट्स नावावर केल्या.
आता बांगलादेशला हे 157 धावांचे सोपे आव्हान 300 चेंडूत पार करायचे आहे. (Afghanistan all out on 156 against bangladesh world cup 2023)
हेही वाचा-
रचिनची बॅटिंग पाहून भारताचा हेड कोच द्रविडही झाला फिदा; म्हणाला, ‘त्याच्यात राहुल कमी अन् सचिन…’
Asian Games Final: ऋतुराजसेनेने जिंकला टॉस, सुवर्णपदकासाठी IND vs AFG संघात महामुकाबला