---Advertisement---

नशीब चांगलं! ‘या’ क्रिकेटरच्या दिशेने फेकला होता बॉम्ब, प्राण गमवावा लागला मित्राला

On: बुधवार, जून 24, 2020 4:12 PM
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूचे नशीब हे विराट कोहली, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरप्रमाणे नसते. या खेळाडूंना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते. परंतु काही खेळाडू असेही आहेत, ज्यांना प्रेम मिळणे तर सोडाच त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यावर आंतकवादी हल्लेही केले जातात. असेच काही अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू करीम सादिकबरोबर घडले आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान आपले क्रिकेट सोडण्याचे कारण सांगितले आहे.

करीम सादिकवर झाला आंतकवादी हल्ला

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खेळाडूंना इतर देशांच्या खेळाडूंपेक्षा अधिक त्रास सहन करावा लागला आहे, कदाचित याबाबत कोणालाही शंका नसेल. करीमबरोबर (Karim Sadiq) घडलेल्या घटनेमुळे त्याला क्रिकेट सोडण्याची वेळ आली. क्रिकट्रॅकरबरोबर झालेल्या लाईव्ह व्हिडिओ चॅट सेशनमध्ये करीमने खुलासा केला, 2018 साली अफगाणिस्तानमध्ये रमझान चषक होणार होता. रमझानपूर्वी वॉर्मअप सामना सुरु होता. परंतु त्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एका पाठोपाठ एक असे धमाके झाले. त्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आणि 45 लोक जखमी झाले. त्या सामन्यात करीमदेखील खेळत होता.

करीमच्या अनेक मित्रांचा झाला मृत्यू

“तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. आम्ही रमझान चषकापूर्वी एक वॉर्मअप सामना खेळत होतो. तो सामना रात्रीच्या वेळी खेळला जात होता. एक डाव संपला होता. मी क्षेत्ररक्षण करत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर एक बॉम्ब फुटला,” असे करीम म्हणाला.

तो पुढे म्हणाला, “आंतकवाद्यांनी माझ्या दिशेनेच बॉम्ब (Bomb) फेकला होता आणि मी पाहिले की लोक इकडे तिकडे पळत होते. मी अनेक लोकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा गेटवर पोहोचलो, तेव्हा पाहिले की तिथे खूप धमाके झाले होते. मी स्वत: अनेक लोकांना रुग्णालयात घेऊन गेलो. त्या हल्ल्यात मी माझ्या लहानपणीच्या मित्रांना गमावले होते. त्या दिवसापासून माझ्या तोंडचे हसू गायब झाले आणि मी क्रिकेट खेळणेदेखील सोडले.”

करीमने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये शारजाह येथे झिंबाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत आपल्या संघाकडून 24 वनडे आणि 36 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले होते. त्यात त्याने 2 शतकांच्या मदतीने 475 धावा केल्या आहेत. तसेच टी20त त्याने 538 धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-चुकिला माफी नाही! ५ अशा घटना जेव्हा पेनल्टी म्हणून विरोधी संघाला मिळाल्या ५ धावा

-युनिव्हर्सल बॉस गेलचा मोठा निर्णय; २०२०मध्ये होणाऱ्या ‘या’ लीगमध्ये नाही खेळणार

-इथं मात्र विराट सचिनला ठरतोय लाख पटीने सरस, पहा काय आहे ‘ती’ गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---