---Advertisement---

ब्रेकिंग! क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, सर्व खेळाडू….

On: शुक्रवार, जुलै 29, 2022 6:40 PM
---Advertisement---

अफगानिस्तान येथील काबूल येथे सुरु असलेल्या एका टी-२० सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काबूल येथे अफगाणिस्तान क्रिकेट प्रिमीयर लीग सुरु होती. त्यावेळी तिथे अचानक आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना घडली. अचानक झालेल्या बॉम्ब ब्लास्टनंतर तेथील सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे एका बंकरमध्ये नेण्यात आले. या हल्ल्याबाबत तपास सुरु असून सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

श्पागिझा क्रिकेट लीगच्या बंद-ए-अमिर ड्रॅगन्स आणि पामिर झल्मी (Band-e-Amir Dragons and Pamir Zalmi) या सामन्यादरम्यान ही घटना घडली आहे. ही टी२० लीग असून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) २०१३ साली ही स्पर्धा सुरु केली होती. तेव्हापासून दरवर्षी ही स्पर्धा खेळली जाते.

 

सामना सुरू असताना हा ब्लास्ट झाल्याने कोणताही खेळाडू जखमी झाला नाही. मात्र प्रेक्षकांमधील काही जण जखमी झाले आहेत, असे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसीब खान यांनी म्हटले आहे.

काबूल येथे दोन दिवसांपूर्वीच गुरुद्वारा कर्ते परवान येथे अशाचप्रकारे बॉम्बब्लास्ट झाला होता. मागील काही काळापासून अशाप्रकारे बॉम्बस्फोट अफगाणिस्तानमध्ये होतच असल्याचं दिसून येत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

हरमनप्रीत आणि रेणुकाचे प्रयत्न व्यर्थ, ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारतावर मिळवला थरारक विजय

रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना

वेस्ट इंडीजच्या पॉवर हिटर्सचा भारत कसा करणार सामना? द्रविडने दिल्या आहेत खास टिप्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---